पुणे- दलित पँथरतर्फे ” पँथर चषक ” या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन पुणे महापालिका क्रीडा समितीचे अध्यक्ष सम्राट थोरात यांच्याहस्ते फलदांजी करून करण्यात आले . या उदघाटन सोहळ्यास महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , पुणे कॅन्टोन्मेण्ट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम व दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम व दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी केले आहे .
पुणे कॅम्पभागातील आझम कॅम्पसच्या मैदानावर मंगळवार १८ एप्रिल २०१७ ते मंगळवार २५ एप्रिल २०१७ च्या दरम्यान होणार आहे . या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये ३२ संघानी सहभाग घेतला आहे . दररोज आठ मॅचेस होणार आहेत .
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एक लाख रुपये व विजयी चषक , व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पंच्यात्तर हजार रुपये व चषक , तृतीय क्रमांकाचे पारितोषिक एकावन्न हजार रुपये व चषक ,चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक एकतीस हजार रुपये व चषक असे असणार आहे . तसेच बेस्ट बॉलर , बेस्ट विकेट किपर , मॅन ऑफ द मॅच असा गौरव उत्कृष्ट खेळाडूंचा केला जाणार आहे .अशी माहिती टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम व दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी दिली .