पुणे- अहमदनगर जिल्ह्यातील बालिकेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले .यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मुठे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले . माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे . पीडित मुलीचे कुटुंब अंत्यत दहशतीखाली आहे . गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे .
या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रेक कोर्टात चालविण्यात यावा , फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे सदर घटनेत सामील सर्व आरोपीना अटक व्हावी .अॅड. हर्षद निंबाळकर , अॅड. उज्ज्वल निंबाळकर ,अॅड. राजा ठाकरे यांच्यापैकी एकाची नियुक्ती करावी , आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये कोपर्डी गावामध्ये सतत दहशत केली जाते त्यांची चौकशी करावी सदर प्रकरणात पीडित कुटुंबियांना २५ लाखांची सरकारी मदत देण्यात यावी , निर्भया अत्याचार व हत्याकांड प्रकारांनानंतर कायद्यामध्ये जो बदल केला त्यानुसार या प्रकारनात ही जलद गतीने तपास कार्यवाही व्हावी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा , सदर खटला एका वर्षात निकाली काढावा
या घटनेमुळे सामाजिक वातावरण गढूळ होण्याची शक्यता आहे ,मा. मुख्यमंत्री यांनी तरी आरोपींच्या कुटुंबियांना भेट घेउन घटनेची गंभीरता समजून घ्यावी आरोपींचा इतिहास तपासून कायदेशीर कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्यावतीने देण्यात आले .
या आंदोलनात संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर , पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे , शहराध्यक्ष सम्राट थोरात , शहर कार्याध्यक्ष सागर आल्हाट , प्रशांत धुमाळ , हवेली तालुका कार्याध्यक्ष प्रफुल्ल गुजर , जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्राची दुधाने , सारिका शिरोळे , जिजाऊ ब्रिगेड पुणे उषा पाटील , मराठा सेवा संघ जिल्हाअध्यक्ष प्रकाश जाधव ,मराठा सेवा समन्व्य कक्ष पुणे शहर अध्यक्ष गणेश गवारे , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा स्मिता म्हसकर , भोर तालुका कार्याध्यक्ष पंढरीनाथ सोंडकर हवेली तालुका अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम , प्रतिमा परदेशी , सपना माळी , डॉ. मानसी जाधव , मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड व्यकंट सूर्यवंशी , वीर भगत सिंग विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते .
या आंदोलनास दलित संघटनांनी पाठिंबा दिला , यामध्ये भीमछावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड , बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे महाराष्ट्र महासचिव मिलिंद अहिरे , दलित पॅन्थर पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे , परिवर्तन ग्रुपअध्यक्ष राहुल तायडे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे पुणे शहर अध्यक्ष दिलीप घोकसे आदींनी पाठिंबा दिला


