इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीचा जोर:एका महिन्यात 2800 युनिट्सपेक्षा जास्त विक्री

Date:

नवी दिल्ली, १ नोव्हेंबर २०२१ – इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि मोटरसायकल्सना मिळत असलेल्या लक्षणीय मागणीच्या जोरावर वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. (बीएसई कोड – 538970) – या देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड जॉय ई- बाइकच्या उत्पादक कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्येही दमदार विक्री कायम ठेवली आहे.

या सणासुदीच्या काळाने बाजारपेठेत उत्साही वातावरण आणि चांगली मागणी दिसून येत असून कंपनीने 2855 इलेक्ट्रिक स्कूटर्स व मोटरसायकल्स युनिट्सची विक्री केली आहे. ऑक्टोबर 2020 मधे झालेल्या 474 युनिट्स विक्रीच्या तुलनेत यंदा तब्बल 502 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीने गेल्या महिन्यात (सप्टेंबर 2021) 2500 युनिट्सची विक्री केली होती व त्या तुलनेत दोन आकडी वाढ – 14 टक्के नोंदवली आहे.

या दमदार विक्री कामगिरीविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते म्हणाले,

‘वडोदरा उत्पादन कारखान्यात आम्ही सुरू केलेल्या नव्या स्वयंचलित जुळणी लाइनमुळे वाढलेली मागणी पूर्ण करणे शक्य होत आहे. त्याचप्रमाणे विविध ठिकाणची आमची ‘जॉय इ बाइक’ एक्सपिरीयन्स सेंटर्स विपणन धोरणांची पुनर्रचना करत संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहेत. या सणांनी संपूर्ण देशात नवा उत्साह निर्माण केला असून आमच्या सर्व टच- पॉइंट्सच्या ठिकाणी अतिरिक्त ऑर्डर्स मिळत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विशेषतः धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभप्रसंगी चांगली रिटेल विक्री होईल आणि पर्यायाने विक्रीचा आणखी एक विक्रमी टप्पा गाठला जाईल याविषयी विश्वास वाटतो.’ 

ऑक्टोबर २०२१ ची महत्त्वाची वैशिष्ट्ये
विक्रीचा विक्रमी टप्पासप्टेंबर २०२१ मध्ये २५०० युनिट्स विक्रीसह आजवरची उच्चांकी विक्री
नेटवर्क विस्तार·         पुणे, महाराष्ट्र येथे कंपनीच्या मालकीच्या ‘जॉय ई बाइक’ एक्सपिरीयन्स सेंटरचे उद्घाटन·         नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रात आणखी ३ नवी एक्सपिरीयन्स सेंटर सुरू करण्याची योजना
आर्थिक वर्ष २२ च्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल·         आर्थिक वर्ष २२ च्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक करोत्तर नफा. आर्थिक वर्ष २१ च्या दुसऱ्या तिमाहीतील २७.९८ लाख रुपयांच्या करोत्तर नफ्याच्या तुलनेत.·         आर्थिक वर्ष २२ च्या दुसऱ्या तिमाहीत ५००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि मोटरसायकल्सची विक्री. वर्ष २१ च्या दुसऱ्या तिमाहीतील ६६४ युनिट्स विक्रीच्या तुलनेत·         आर्थिक वर्ष २२ च्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न ३३.५१ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २ च्या दुसऱ्या तिमाहीतील ६.९० कोटी रुपयांच्या तुलनेत.

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडविषयी

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. ही इलेक्ट्रिक दुचाकी (ईव्ही) क्षेत्रातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असून ती जॉय ई- बाइक्स ब्रँडच्या दुचाकींचे उत्पादन करते. बीएसईवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रातील पहिली नोंदणीकृत कंपनी या नात्याने कंपनीने भारतीय ईव्ही क्षेत्राच्या संभाव्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या तत्वाशी सुसंगत राहात सध्याच्या वाहतूक व्यवस्थेला हरित पर्याय देण्यावर कंपनीचा भर आहे. जॉय ई- बाइक्सच्या माध्यमातून कंपनी नेहमीच्या इंधनांवर चालणाऱ्या बाइक्सना पर्याय उपलब्ध करून देत आहे. कंपनी देशभरातील २५ प्रमुख शहरांत कार्यरत असून ही संख्या आणखी वाढवण्याची योजना आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा...

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...