Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भारत एकसंघ केला तो इंग्रजांनी .. .डॉ.विश्वंभर चौधरी

Date:

IMG_9431
निर्माते एम के धुमाळ यांना डॉ.सप्तर्षी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
IMG_9412
दीपक बिडकर यांना वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले

पुणे- ५०० संस्थानांमध्ये आणि बहुविविध  संस्कृतीत विखुरलेला देश -भारत देश एक संघ केला तो इंग्रजांनी ..प्रश्न आहे तो आता आपला भारत कसा असावा ?पण त्याला बगल दिली जाते . मुळात आता  प्रत्यक्षात फुट पाडून राजकीय स्वार्थ साधणारे  राजकारण करताना  ‘अखंड भारत ‘ अशी जी कल्पना मांडली जाते आहे ती ‘सुंदर’च म्हटली पाहिजे असा टोला मारून समाज प्रबोधक डॉ. विश्वंभर चौधरी यांनी काँग्रेस चे सरकार भांडवलशाहीच होते पण आताचे सरकार भांडवलशाही तर आहेच त्याचबरोबर धर्मातेरेकी देखील आहे त्यामुळे ते देशाला अतिशय घातक आहे असे स्पष्ट प्रतिपादन केले .

ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी , डॉ. विश्वंभर चौधरी आणि भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांना  ‘सलाम पुणे’ पुरस्काराने पुण्याच्या पत्रकार भवनात झालेल्या समारंभात सन्मानित करण्यात आले .यावेळी ते बोलत होते . सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर , अभिनेत्री जयमाला काळे -इनामदार , सहित्यिक संजय सोनवणी , ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर ,चित्रपट निर्माते एम .के धुमाळ ,संगीतकार आदी रामचंद्र , मेघराज भोसले ,डॉ. सतीश देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

डॉ. चौधरी म्हणाले कि , आज आक्रोशाला विद्रोह आणि विद्रोहाला देशद्रोह म्हटले जावू लागले आहे .सहिष्णू परंपरेत आक्रोश विद्रोह समजून घेते .ती परंपरा आता नष्ट झाली आहे कुठे आहे असहिष्णू वातावरण ? असे ओरडून ओरडूनच असहिष्णू वातावरण निर्माण केले जाते आहे . आज संघार्षालाच फार प्रश्न विचारले जातात . पण ज्यांच्यासाठी हा संघर्ष केला जातो तेच हे प्रश्न सातत्याने विचारत राहतात हे आणखी दुर्दैवी आहे. त्यामुळे संघर्षाची वाट देखील  दुर्दैवी होत चालली आहे . पूर्वी सोशल मिडीयावर ९५ टक्के चर्चा भ्रष्टाचाराविषयी होत आता धर्म्वादाविषयी होते हे चिंताजनक आहे . एक -एक वर्षात समाजात हिरो बदलला जातो आहे . अन्ना हजारे नंतर अरविंद केजरीवाल नंतर नरेंद्र मोदी देशाचे हिरो झाले यातून काय बोध घ्यायचा ? भ्रष्टाचार संपला नाही आणि इतर बाबींवरच जनतेला ओढले जाते आहे . देशद्रोही कोण हे सांगण्याचा अधिकार जनतेला नाही आणि शासनालाही नाही तो केवळ न्यायव्यवस्थेलाच आहे हे विसरता कामा नये . आम्ही सांगतो तोच राष्ट्रवाद असे सांगितले जाते आणि समाज हि ते आंधळेपाने मान्य करीत असेल तर कठीण काळ आहे . वल्लभभाई पटेल , पंडित नेहरू , नैष्णाल हेराल्ड जुने नेते घटना का पुन्हा पुन्हा समोर आणल्या जातात . भारत कधीच अखंड नव्हता तो एकसंघ केला इंग्रजांनी . प्रश्न असा आहे आपला भारत आता कसा असावा . नरेंद्र मोडी आणि नितीन गडकरी विकासाच्या मार्गावर आहेत आणि संघ धर्माच्या मार्गावर … एक लक्षात घ्या मोडी- गडकरी कधीही धर्मावर भाष्य करीत नाहीत . संघ मात्र आक्रमक असतो . माणसाचे डोके धर्माने एवढे व्यापले आहे कि विज्ञानाला कुठे जागाच ठेवली नाही . भारत महासत्ता होणार होणार अशी हकोती आम्ही नेहमी ऐकतो… आणि देशाच्या अर्थसंकल्पात विज्ञानासाठी १तक्क तरी तरतूद आहे कहो ? मग कसा भारत महासत्ता होणार . जुन्या बुरसटलेल्या परंपरा आणि रूढी घेविउन जनतेला बनविता येईल देश महासत्ता कसा होईल असे ते म्हणाले  .

डॉ. कुमार सप्तर्षी यावेळी म्हणाले ,’ समाज एकसंघ राहावा म्हणून पुरोगामी सातत्याने काम करीत असतात . ज्यांना समाज एकसंघ नको आहे ते पुरोगामी दहशतवाद अशी आता नवी व्याख्या मांडू लागले आहेत . एकीकडे पुरोगाम्यांना मारले जाते मग त्यांची कसली आली दहशत ? मात्र प्रतिगामी लोकांचा बुध्यांक कमी आहे त्यामुळे ते कोणतीही गोष्ट बुद्धीने पटवून देवू शकत नाहीत . पुरोगामी लोकांचा पराभव करू शकत नाहीत .

मुख्यमंत्र्यांची भूमिका दुटप्पी — तृप्ती

तृप्ती देसाई म्हणाल्या कि , पुरुष स्त्री समानते साठी अनेक चांगले  निर्णय या देशात यापूर्वी घेतले गेले . देवाच्या दर्शनासाठीच दुजाभाव का ? एवढा राहिलेला मुद्दा हि आता पुढे आणला पाहिजे . देवाला सारी लेकरे सारखी .. त्याच्या दारात कसला आला भेदभाव … ? यासाठी आपण लढा देवू . मुख्यमंत्री यांनी ठरविले असते तर ते स्वतः आम्हाला शनी च्या चौथऱ्यावर घेवून जावू शकले असते . पण ७० किलोमीटर अलीकडेच आम्हाला अटक केली जाते म्हणजे हि दुटप्पी भूमिका आहे .

IMG_9530
जनजागृती फौन्डेशनचे अध्यक्ष वकील दिलीप जगताप यांचा सन्मान
IMG_9492
विपश्यानाकार डॉ दत्ता कोहिनकर यांचा सन्मान
IMG_9525
यलो चित्रपटाची नायिका , आंतरराष्ट्रीय जलतरणपटू गौरी गाडगीळ
IMG_9444
अभिनेता वैभव पगारे यांचा सत्कार
IMG_9441
अभिनेत्री जयमाला काळे -इनामदार यांचा सत्कार
IMG_9434
मास्टर शिवा या आगामी चित्रपटाची टीम
IMG_9427
संगीतकार आदी रामचंद्र यांचा सत्कार
IMG_9421
बालकलाकार साहिल मरगजे याचा सत्कार
IMG_9419
चित्रपट निर्माते मेघराज भोसले यांचा सत्कार
IMG_9408
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील ओंकार देव यांनी केले

 

IMG_9493
अभिनेता सचिन गवळी याचा सत्कार
IMG_9416
प्रसिध्द मोहनकुमार भंडारी यांचा सत्कार
IMG_9424
डॉ. सतीश देसाई यांचा सत्कार
IMG_9436
दिग्दर्शक शिव कदम यांचा सत्कार
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल...

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी...

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...