पुणे प्रतिनिधी :- महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहे तसेच मानव कल्याणाच्या कार्यातसुद्धा महिला मागे नाही . संताचे जीवन हे सुद्धा खुप सुळावरच्या पोळी सारखे असते . खुप त्याग करावा लागतो त्याशिवाय पाहता भक्तीला रंग येत नाही . दिव्य दृष्टी हि ज्ञानातूनच मिळते . भक्त हा नेहमी आपले जीवन भक्ति भावाने अनुभवतो आणि इतरांना सुद्धा त्याचा प्रकाश देतो असे उद्गार शालू चलानी ( मुंबई ) ह्यांनी संत निरंकारी नारी समागम मध्ये काढले . पुणे झोन च्या वतीने हा नारी संत समागम आयोजित केला होता . यामध्ये पुण्याचे झोनल इंचार्ज ताराचंद करमचंदानी स्थानिक नगरसेवक सुनिल कांबळे उपस्थित होते .समागमाला पुणे जिल्ह्यातुन सुमारे 3 ते 3500 महिला भगिनींनी हजेरी लावली गंगाधाम चौक मार्केटयार्ड येथे लावली . या कार्यक्रमामध्ये विविध प्रकार चे भक्तीला चालना मिळेल असे खेळ , संगीत आणि विचाराच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले .

