साईबाबा संस्थानने तातडीने ऑक्सिजन प्लँट सुरु करावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

Date:

शिर्डी, दि. १७ :- कोविडच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोविडबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करताना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज पडते. येणाऱ्या काळात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याने, कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजन वायूच्या पुरेशा उपलब्धतेसाठी साईसंस्थानने साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल येथे हवेतून ऑक्सिजन मिळण्यासाठी आवश्यक प्लँट तातडीने उभारण्याचे निर्देश पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले.

राहाता तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, शिर्डी परिसरातील कोविड केअर सेंटरची पाहणी तसेच लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहात्याचे तहसलिदार कुंदन हिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ओमप्रकाश पोखर्णा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकिय संचालक डॉ.प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वैद्यकिय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे, सचिन चौगुले, रमेश गोंदकर यावेळी उपस्थित होते.

साईबाबा सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल येथे जवळपास 550 बेड्स असून त्यापैकी 150 बेड्स नॉन-कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवावे आणि उर्वरित चारशे बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची सूचना यावेळी पाकलमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केली. कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या बेड्ससह ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबरोबरच व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्याचे तसेच यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीने कारवाई सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री महोदयांनी दिले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांनीही स्वयंशिस्तीचे पालन करुन जनता कर्फ्यु लागू करावा, असे आवाहन यावेळी मंत्रीमहोदयांनी केले. यासाठी ग्राम समिती आणि प्रभाग समित्यांनी पुढाकार घेण्याची सूचना त्यांनी केली. राहाता व आजूबाजूच्या तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचारासाठी शिर्डी येथे योग्य व्यवस्था केल्यास रुग्णांना दिलासा मिळेल, अशी आशा मंत्री श्री.मुश्रीफ व्यक्त केली.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या कार्यात थोड्या अडचणी असून त्यात मार्ग काढता येईल असे सांगितले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भविष्यातील कोविडबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात स्थानिक प्रशासनाने सर्व व्यवस्था करावी तसेच यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याची सूचना केली. आमदार आशुतोष काळे यांनीही कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाने तातडीने सर्व उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली.  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी आवश्यक विविध प्रशासकीय मान्यता प्राधान्याने देण्यात येईल असे आश्वासन दिले.

उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रास्ताविकात प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोविड रुग्णांची काळजी घेण्यात येत असून त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून यामध्ये श्री साईबाबा संस्थान तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्टची मदत झाल्याची माहिती दिली.

बैठकीला विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

साईआश्रम धर्मशाळेतील कोविड केअर सेंटरला पालकमंत्र्याची भेट

श्री साईबाबा संस्थान संचलित साईआश्रम फेज दोन येथील धर्मशाळेतील कोविड केअर सेंटरला आज पालमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा, औषधे, नाष्टा व जेवण, परिसराची स्वच्छता, पिण्याची पाण्याची व्यवस्था याबाबत पालकमंत्र्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनातर्फे केलेल्या उपाययोजनांवर त्यांनी समाधान व्यक्त केले. कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व संबधितांनी दक्षता घेण्याची सूचना मंत्रीमहोदयांनी यावेळी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...