सद््गुरु श्री जंगली महाराज १३२ वा पुण्यतिथी उत्सव शनिवारपासून

Date:

व्याख्याने, संगीतसभा, भजने आणि विविध धार्मिक कार्यक्रम
पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३२ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक २ एप्रिल ते शुक्रवार, १५ एप्रिल २०२२ दरम्यान जंगली महाराज रस्त्यावरील मंदिरात उत्सव होणार आहे. उत्सवात धार्मिक कार्यक्रम भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत. 
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता शंकरराव आढाव बंधू यांचे सनईवादन होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, भजन  आणि आरती होणार आहे. शनिवार दिनांक २ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ५.४५ पर्यंत महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत.
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. डॉ.योगेश गोडबोले, डॉ.सागर देशपांडे, दत्तात्रेय धाईंजे, पद्मश्री पोपटराव पवार, श्रीनिवास पेंडसे, प्रा.मुक्ता गरसोळे- कुलकर्णी, डॉ. दत्तात्रेय तापकीर, डॉ अविनाश भोंडवे, डॉ. चंद्रशेखर टिळक, चंद्रकांत शहासने, विद्या लव्हेकर, सचिन पवार, आदित्य अभ्यंकर, डॉ. रवींद्र भोळे आदी मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
दिनांक २ ते १४ एप्रिल दरम्यान दररोज रात्री ८ वाजता प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये तुकाराम दैठणकर, राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, पं. आनंद भाटे, पं. विजय कोपरकर, डॉ. राजेंद्र दूरकर, नेहा चिपळूणकर, पद्माकर गुजर, चैत्राली अभ्यंकर, सुनील पासलकर जितेंद्र भुरुक, राजेश दातार, सावनी रविंद्र आदी कलाकार सादरीकरण करणार आहेत. शुक्रवार दिनांक १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जंगली महाराजांचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर १६ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...