चातुर्मासनिमित्त गणेश पेठमधील सादडी सदनमध्ये वर्धमान स्थानाकवासी जैन श्रावक संघ येथे प. पुज्य प्रियदर्शनाजी म. सा. , प. पुज्य रत्नज्योतीजी म. सा. आदी ठाणा ७ चा मंगल प्रवेश संपन्न झाला . शनिवारवाडा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेमध्ये सादडी युवक मंडळ , सादडी बहू मंडळ , सादडी स्वाध्याय मंडळ , सादडी महिला मंडळ , सेवा संघ , वितराग सेवा संघ आदी सहभागी झाले होते .
या शोभायात्रेमध्ये महापौर मुक्ता टिळक , नगरसेविका विशाल धनवडे , नगरसेविका सुलोचना कोंढरे , नगरसेवक वनराज आंदेकर , संघाचे अध्यक्ष खुबीलाल सोलंकी , अशोक कावेडिया , उपाध्यक्ष केवलचंद तेलीसरा , सुरेंद्र पुनमिया , विजयकांत कोठारी , पोपटशेठ ओस्तवाल , मांगीलाल मांडोत , नगराजी पुनमिया, दिनेश पुनमिया, रतनचंदजी पुनमिया, नगरसेवक प्रविण चोरबेले , नितीन पुनमिया, जितेंद्र पुनमिया, विनोद कावेडिया , पोपटशेठ सोलंकी आदी मान्यवर सहभागी झाले होते . यावेळी सूत्रसंचालन नरेंद्र सोलंकी यांनी केले .
चार महिने साध्वीचे रोज सकाळी ९ ते १० धार्मिक प्रवचन होणार आहे . दुपारी अडीच वाजता धार्मिक अध्यायन , रात्री आठ वाजता स्तुती , मंगल पाठ होणार आहे .

