Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सचिन तेंडूलकरचा डिजिटल गेमिंगच्या विश्वात प्रवेश; सचिन सागा या पहिल्या अधिकृत गेमचा पहा ट्रेलर

Date:

पुणे: क्रिकेटपटू, मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर आता तुमच्या घरी येतोय… होय, तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातूनतुमच्या अगदी जवळ येतोय…

आपल्या कर्तृत्वाने क्रिकेटचे मैदान गाजवलेला सचिन आता सचिन सागा या त्याच्या पहिल्या अधिकृत
गेमच्या माध्यमातून डिजिटल गेमिंगच्या विश्वात प्रवेश करीत आहे. यासंदर्भातील घोषणा जेटसिंथेसिस प्रा.लि. चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजन नवानी यांनी आज येथील पत्रकार परिषदेत केली.

प्लेइजऑन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या जेटसिंथेसिसच्या गेमिंग कंपनीच्या वतीने या अफलातून कल्पनेचे एकामहान खेळाडूच्या चित्ताकर्षक गेममध्ये रुपांतर केले गेले आहे. फ़्लुएन्स या भारतातील सेलिब्रिटी डिजिटलनेटवर्कच्या सहाय्याने जेटसिंथेसिस आणि सचिनचे बंध जुळून आले आहेत.

डिजिटल गेमिंगच्या विश्वातील प्रवेशावर प्रतिक्रिया देताना सचिन म्हणाला, की माझ्यावर तयार करण्यातआलेल्या पहील्या डिजिटल गेमबद्दल मलासुद्धा खूप उत्सुकता आहे. प्लेइजऑनसोबत भागीदारी करूनआम्ही सचिन सागा हा सर्वांनाच आगळावेगळा अनुभव देऊन जाणारा खास गेम तयार केला आहे. मीवेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहभागी झालो आहे. हा अनुभव आपल्यापैकी सर्वांना नक्कीच एकत्रितपणे एन्जॉयकरता येऊ शकणारा आहे.

या प्रसंगी बोलताना राजन नवानी म्हणाले, की शतकातील एका महान खेळाडूच्या पहिल्या अधिकृत गेमची रचना, निर्मिती आणि वितरण करण्यासाठी सचिन तेंडूलकर याच्याबरोबर सहकार्याचे संबंध
प्रस्थापित करता आल्याचा आम्हाला अभिमान आहे. भारत व अमेरिकेतली उच्चशिक्षित गेमिंग तज्ञांचे
सहकार्य या गेमच्या निर्मितीमध्ये घेण्यात येणार असल्यामुळे या गेममधून मिळणारा अनुभव हा जागतिक दर्जाचा असेल यात शंका नाही. या माध्यमातून सचिनने क्रिकेट विश्वात निर्माण केलेल्या परंपरेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सचिन सागाविषयी तपशील देताना ते म्हणाले, की हा गेम म्हणजे एक प्रकारे सचिनच तुमच्या घरी येत
आहे. तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून सचिन तुमच्या खूप जवळ येणार आहे. सचिन सागातून सचिनच्या महान क्रिकेट कारकीर्दीचा अनुभव प्रथमच डिजिटल गेमिंगच्या विश्वात घेता येणार आहे. सचिनच्या आवडत्या १०० सामन्यांमध्ये तुम्हाला सचिन म्हणून खेळण्याची संधी मिळणार आहे. यामुळे तुम्हाला सचिनप्रमाणे विचार करण्याची शिकवणच मिळणार आहे. या गेमदरम्यान तो तुमचा प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असणार आहे. सचिन म्हणून तुम्हाला तुमचा संघ निवडायला मिळणार असून, तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर खेळून विश्वचषकही जिंकता येणार आहे. या गेमची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे, की ज्यातून मनोरंजन तर होईलच पण त्याचबरोबर उच्च दर्जाच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी प्रशिक्षितही केले जाईल. सचिनने आपल्या कारकि‍र्दीत जी मूल्ये जपली व जी नंतर जगातील सर्व क्रिकेटरसिकांची प्रेरणास्त्रोत बनली, त्यांचा अंगीकारही या गेमच्या माध्यमातून केला गेला असून, ती नकळतपणे तुमच्यापर्यंत पोचविली जाणार आहेत.

सचिन सागा हा डिजिटल गेम अँड्राईड, आयओएस, विंडोज स्मार्टफोन्सवर येत्या ५ ते ६ महिन्यात उपलब्धकरून दिला जाणार असून, तो कॉन्सोल्सवरदेखील सादर केला जाणार आहे. येत्या १० ते १२ आठवड्यात   या गेमचा प्रीक्वल सादर केला जाणार आहे.

प्रवर्तकांविषयी –
जेटसिंथेसिस प्रा. लि. ही गॅरेजची प्रवर्तक असून, नवानी कुटुंबाचा डिजिटल व्यवसाय आहे. त्याची मालकी
जेटलाईन ग्रुप ऑफ कंपनीजकडे आहे. त्याची बिजे १९३० मध्ये बँकॉकमध्ये (थायलंड) रोवली गेली होती.
हा समूह पॅकेजिंग निर्मिती, आयटी सेवा आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहे. जेटसिंथेसिसचा भर
नाविन्यपूर्ण मनोरंजन आणि संघटित रिटेल क्षेत्रासाठी विविध प्रकारची आयटी व मोबाईल
अॅप्लिकेशन्सच्या निर्मितीवर आहे. आता त्यांनी स्टार्ट – अप्ससाठी पायाभूत सुविधा आणि सुयोग्य अशी
परिसंस्था तयार करण्याच्या क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.
इन्फोसिसचे सह- संस्थापक क्रिस गोपालकृष्णन हे या कंपनीचे अ- कार्यकारी अध्यक्ष असून, राजन नवानीहे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. राजन हे इंडिया अॅट ७५फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर:आता मतमोजणी 21 डिसेंबरलाच

नवी दिल्ली- राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतदान...

अ. भा. कॉंग्रेस पक्षाच्या ओ.बी.सी. सेलच्या राष्ट्रीय समन्वयकपदी दीप्ती चवधरी

पुणे- अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक...

पुतिन यांना राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी:राजघाटावर गांधींना श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात...