पुणे-( राम शेडगे )
जिद्द आणि कष्ट करायची तयारी असली की माणसाच्या समोर आकाश देखील ठेंगणे होते. असचं एक मूर्तिमंत उदाहरण सचिनचं आहे. ‘कट्टा’ या मराठी चित्रपटाची तो निर्मिती करत असून ड्रीम टॅाकीज या निर्मिती संस्थेचा हा पहिला चित्रपट असणार आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टील तगडी कलाकार मंडळी या चित्रपटात काम करणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ‘कट्टा’ असतो. त्या कट्यावर जावून तो स्वत:ला स्वत:मध्ये रमवून घेत असतो. अस प्रत्येक मनाचा ठाव घेणार चित्रपटचं कथानक आहे. या चित्रपटाची धुरा ‘सचिन दुबाले – पाटील’ याने स्वत: पेलली आहे.
मुळचा बीडचा असणाऱ्या सचिनच्या किशोर वयातच वडिलांचे छपर हरवले. डोंगरा एवढा आधार अचानक निघून गेल्याने सचिनने गाव सोडले. अन् थेट पुणे गाठलं. बाबा गेलेल्याचे दुख: कवठाळून न बसता तो स्वत: आई, भावासाठी मोठा आधार बनून त्यांना आदर्श जीवन दयाचे. या ध्येयाने सचिन त्याच्या आयुष्याची मुहूर्त मेढ कॉफी शॉपच्या दुकानात रोवली आणि जीवनाचा श्री गणेशा करून नवीन आयुष्याला सुरवात केली. कॉफी शॉपमध्ये काम करताना सचिनच्या मनात एक विचाराणे ग्रासला होता तो म्हणजे चित्रपटसृस्तीत करिअर करायचं. सचिनचे ध्येय वेगळे असल्याने तो कॉफी शॉपमध्ये जास्त रमला नाही. चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले व शशी खंदारे यांच्या संपर्कात तो गेला. आणि खऱ्या अर्थाने त्याने चित्रपट व नाट्यसृष्टीत त्याने पदार्पण केले आणि तो प्रकाश व्यवस्थापनचे काम करू लागला.
नाटकात काम करत असताना दिग्दर्शक नितीन भास्कर व ध्वनी संयोजक राशी बुट्टे यांची ओळख झाली आणि राशी बुट्टे यांच्याकडे सह साउंड रेकॉर्डीस्ट म्हणून काम सुरु केले. सुहासिनी मालिका, प्रसिद्ध चित्रपट बालक – पालक, टाईमपास, टाईमपास २, प्रेम म्हणजे प्रेम असत. अरे आवाज कोणाचा, येलो, योद्धा, कापूस कोंड्याची गोष्ट असे चित्रपट त्याने केले. त्यातच कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे यांची भेट झाली त्यांच्या बरोबर हॉलिवूडची जाहिरात, ‘रानभूल’ चित्रपट केला.
स्वतंत्र निर्मिती व्यवस्थापक म्हणून कामाला सुरवात केली. त्यात ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘हेडलाईन ‘सल’ हे चित्रपट निर्मिती व्यवस्थापक म्हणून केले. कार्यकारी निर्माता म्हणून त्याचे आगामी चित्रपट ‘आटपाडी नाईटस’, ‘बाजार’, ‘लाडकी लेक’, ‘अॅटमगिरी’, फोकस, जामवंती व हिंदी ‘मेरीट अॅनिमल’ हे चित्रपट आहेत. त्याचा मित्र व कामातील साथीदार विष्णू घोरपडे व तो एक नाट्य निर्मिती देखील करणार आहेत. अशा या हरहुन्नरी सचिनला व त्याच्या नव्या इनिंगला खूप शुभेच्छा.

