पुणे -साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान तर्फे पाच प्रतिभावान रंगभूमी कलाकारांसाठी दरवर्षी देण्यात येणारा ‘विनोद दोशी पुरस्कार’ आज रोजी जाहीर करण्यात आला. 1 लाख रूपयांचा हा वार्षिक पुरस्कार 2016-17 या वर्षासाठी संदीप शिखर, विक‘ांत ठकार, प्रविण काळोखे, निम्मी राफेल व कल्याणी मुळे यांना देण्यात येणार आहे. या वर्षीची पुरस्काराची कक्षा राष्ट्रीय स्तरावर रूंदावली गेली आहे.
हा अव्दितीय पुरस्कार देण्याचे प्रतिष्ठानचे हे अकरावे वर्ष असून आजपर्यंत 47 कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. प्रसिध्द उद्योगपती कै.श्री.विनोद दोशी यांच्या नावे हा पुरस्कार प्रदान केला जातो. विनोद दोशी यांना कला व साहित्य क्षेत्रात प्रचंड रूची होती. रंगभूमीप्रती उत्कट प्रेम असल्याने त्यांनी रंगभूमीच्या उत्कर्षासाठी खूप परिश्रम घेतले. 1960-70 च्या दशकामध्ये आधुनिक रंगभूमी चळवळीचे ते आश्रयदाते होते.
पत्रकारांशी बोलताना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्र्वस्त अशोक कुलकर्णी म्हणाले की, 2003 मध्ये काही कलाकारांनी साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानची स्थापना केली. कला व कलाकारांना प्रोत्साहन देणे हा प्रतिष्ठानचा उद्देश आहे. कलेच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणार्या व कला क्षेत्रातच महत्वाकांक्षी कारर्किद करू इच्छिणार्यांना प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्कार देऊन आर्थिक पाठिंबा दिला जातो.
‘विनोद दोशी पुरस्कार’चे या वर्षीचे वैशिष्ट्य सांगताना कुलकर्णी म्हणाले की, या वर्षी पुरस्कार राज्यस्तरीय मर्यादित न राहता आता त्याची कक्षा राष्ट्रीय स्तरावर रूंदावली गेली आहे. 2015 पर्यंत फक्त महाराष्ट्र राज्यातील कलाकार रंगकर्मींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येत होती. या वर्षी देशाच्या विविध राज्यातील कलाकारांची निवड करण्यात आली असून 3 पुरस्कार्थी महाराष्ट्रातून 1 पॉंडेचरी व 1 कर्नाटक मधील आहे.
‘विनोद दोशी पुरस्कार’ प्रदान करण्यासाठी प्रतिष्ठानला दरवर्षी ‘विनोद आणि शरयु दोशी फाऊंडेशन’कडून 5 लाख रूपयांची देणगी मिळते. सुरवातीला प्रतिष्ठान तर्फे 2 किंवा 3 कलाकारांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत असे. सात वर्षापुर्वी फाऊंडेशनच्या डॉ. सरयु दोशी आणि मैत्रेय दोशी यांनी प्रतिष्ठानला पाठिंबा देत सहकार्य केले. त्यांच्या सहयोगातून आता दरवर्षी 5 कलाकारांना ही शिष्यवृत्ती ‘विनोद दोशी पुरस्कार’ या नावाने दिली जाते. विनोद आणि शरयु दोशी फाऊंडेशन ही एक सार्वजनिक धर्मादाय संस्था असून ते दरवर्षी शिक्षण, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यांना प्रोत्साहन देण्यास संस्थे तर्फे 1 कोटी रूपयांची देणगी देण्यात येते.
या पुरस्काराची 1 लाख रूपयांची रक्कम कलाकारांना 12 धनादेशांव्दारे दिली जाते. यामुळे कार्यपध्दतीमधील कुठेही दिरंगाई न होता कलाकारांना मासिक खर्चासाठी हातभार मिळतो.
पुरस्कारबद्दल अधिक माहिती देताना सतीश आळेकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार विनाअट प्रदान करण्यात येतो, हे याचे मु‘य वैशिष्ट आहे. तसेच यासाठी कोणतीही अर्ज, निमंत्रण किंवा निवड-प्रकि‘या अशा गोष्टी नसतात. आपल्या कलेच्याप्रति समर्पितवृत्तीने काम करण्याची इच्छा व सक‘ीय सहभाग असणारे, नाट्य चळवळीत कार्यरत असणारे कलाकार या पुरस्कारासाठी पात्र ठरतात. नाट्यसृष्टीत महत्वाचे काम करणार्यांना मदत म्हणून हा पुरस्कार दिला जातो. ही पुरस्काराची रक्कम खर्च करण्यास संस्थे तर्फे कोणतीही मर्यादा नसून कलाकार आपल्या इच्छेनुसार ही रक्कम खर्च करू शकतात.
या वर्षी प्रतिष्ठान तर्फे प्रकाशन क्षेत्रातही पाऊल टाकले असून 2015 मध्ये प्रतिष्ठानने ‘अजुन तेंडूलकर’ (मराठी) संपादिका रेखा साने इनामदार व ‘द सिन्स वी मेड’ (इंग‘जी) संपादिका शांता गोखले ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यासाठी हातभार लावला आहे.
हा पुरस्कार रविवार, दि.21 फेब‘ुवारी 2016 रोजी पुण्यातील पंडीत फार्मस् येथे होणार्या औपचारीक कार्यक‘मात राष्ट्रीय ‘यातीचे कला संपादक व समीक्षक तसेच प्र‘यात वक्ते सदानंद मेनन यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.






