साहिल मरगजे धनकवडी परिसरातच राजमुद्रा सोसायटीमध्ये राहणारा एक
गुणी बाल कलाकार म्हूणून नावारुपास येत आहे. त्याचे नाव आता ब-याच रसिक
प्रेक्षकांपर्यत पोहचले आहे. साहिलचा जन्म 4 जुलै 2004 रोजी झाला असून तो
सध्या 12 वर्षाचा आहे. मात्र, त्याने त्याच्या कमी वयात नृत्य आणि अभिनय क्षेत्रात
फार मोठा नावलौकिक मिळविला आहे. शिवाय, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नृत्य
आणि स्टंटचे दिमाखदार सादरीकरण त्याने केले आहे. साहिल हा मुळचा एक
‘उत्कृष्ठ डान्सर’ आहे. मात्र, त्याने अभिनयात ही स्वतःला सिध्द केले आहे. ‘स्टार
प्रवाह वाहिनी’वरील डॉ. अमोल कोल्हे सुत्र संचालित असलेल्या ‘मंडळ भारी’ आहे
या कार्यक्रमामध्ये भन्नाट स्टंटचे साहिलने सादरीकरण करुन रसिकांची दाद
मिळविली आहे. ‘स्टार प्रवाह वाहिनी’वरील या कार्यक्रमात त्याने सादर केलेल्या
स्टंटला अनेक दिग्गजानी सलाम केला होता. तसेच डॉ. कोल्हे यांनी त्याचे
मनभरुन त्यावेळी कौतूक केले होते. ‘पुणे फेस्टिवल’ आयोजित ‘उगवते तारे’
कार्यक्रमामध्ये साहिलने त्याचे सादरीकरण प्रेक्षकांची प्रशंसा मिळविली आहे.
‘झी टॅाकीज प्रस्तुत’ व सुप्रसिध्द निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर
निर्मित व धकधक गर्ल माधुरी दिक्षित व सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी यांच्या
उपस्थित पार पडलेल्या ‘मराठी तारकां’च्या ऐतिहासिक 500 व्या प्रयोगामध्ये
साहिलला नृत्य करण्याची संधी मिळाली आहे. मातोश्री वृध्दाश्रम येथे महेश टिळेकर
आयोजित ‘लिटल स्टार’ कार्यक्रमात सहभाग. दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न
होणा-या ‘सलाम पुणे’ आयोजित मानाच्या ‘रंगभूमी दिन’ सोहळ्यात गायक-
संगितका हर्षित अभिराज यांनी गायलेल्या बाप्पा मोरया गाण्यावर साहिलने सादर
केलेले नृत्य पाहून प्रेक्षकांबरोबरच ‘चला हवा येऊ द्या’ फेम डॉ. निलेश साबळे
कौतूक केले. साहिल विषयी बोलताना साबळे म्हणाले, सलाम पुणे च्या
व्यासपीठावर ज्या कलाकारांनी सहभाग घेतला त्यांना भविष्यात चांगल्या संधी
मिळाल्या आहेत. अशीच संधी साहिलला अशी आशा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
त्याने सहभाग नोंदविला आहे. ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई’ तर्फे
आयोजित सोलापुर येथे संपन्न झालेल्या पहिल्या ‘अखिल भारतीय मराठी
बालनाट्य संमेलनास’ बाल कलावंत रजनी मध्ये त्याने सहभाग घेतला नोंदविला
आहे. ‘पुणे नवरात्र महोत्सव’ आणि ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती’
आयोजित ‘पद्म पुरस्कार सोहळा’ आदी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नावाजलेल्या
मान्यवर कलाकारांसमोर नृत्याचे सादरीकरण साहिलने केले आहे. ‘लायन्स क्लब’
आयोजित डान्स स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन कलेचे सादरीकरण केले आहे. ‘रामकृष्ण
सेवा संघ’ आयोजित ‘काली पुजा महोत्सवा’मध्ये त्याने नृत्य सादर केले आहे.
‘रत्नाकर शेळके डान्स अॅकॅडमी’ आय़ोजित ‘बॅालिवूड तरंग 2015’ मध्ये साहिलने
सहभाग घेतला आहे.
वि.वि.शिरवारडकर तथा कुसुमाग्रज यांच्या लेखनीने अजरामर ठरलेल्या व
‘तिर्थराज’ निर्मित तसेच गिरीष देशपांडे दिग्दर्शित ऐतिहासिक ‘नटसम्राट’ या
नाटकामध्ये त्याने अभिनय केला आहे. युवा दिग्दर्शिक गौरव देशपांडे लिखित
स्वामींच्या अमृत जीवनावर आधारित ‘योगिराज’ नाटकामध्ये साहिलने अभिनयाचा
ठसा रसिक मनावर उमठविला आहे. अनेक नामवंत कलाकारांनी साहिलच्या नृत्य
आणि अभिनयास वेळोवेळी दाद देऊन कौतूक केले आहे. तसेच त्याला बाल वयातच
रसिक प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम लाभले आहे.
साहिलच्या नृत्य आणि अभिनयाची दखल घेऊन त्याला अनेक नामवंत
संस्थातर्फे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र, त्यामधील काही
ठळक पुरस्कारांचा आपण येथे आढावा घेऊयात. नृत्य क्षेत्रामध्ये मिळविलेल्या
उल्लेखनीय यशाबद्दल ‘दलित युवक आंदोलन, महाराष्ट्र’ या सामाजिक संघटनेतर्फे
राष्ट्रीय नेते व मा.खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘बालनृत्य पुरस्कार’
देऊन गौरविण्यात आले आहे. ‘पुणे नवरात्र महोत्सव समिती’चे अध्यक्ष व
उपमहापौर मा.श्री.आबा बागुल यांच्या हस्ते म्हणून सत्कार व पुरस्कार प्राप्त झाला
आहे. साहिल शिक्षण घेत असलेल्या ‘प्रियदर्शनी इंग्लिश स्कुल’ या शाळेच्या वार्षिक
स्नेहसंमेलनामध्ये संस्थेचे संस्थापक व शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अप्पासाहेब
रेणुसे आणि् स्थायी समितीचे अध्यक्ष श्री.विशालजी तांबे यांच्या शुभहस्ते ‘बेस्ट
स्टुडंट ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र
शिक्षण प्रसारक मंडळ, धनकवडी’ येथील बालाजी माध्यमिक विद्यालय आयोजित
वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मा. वरिष्ठ पोलिस महानिरिक्षक रघुनाथ खैरे व एटीएस
प्रमुख भानूप्रताप बर्गे यांच्या हस्ते ‘उत्कृष्ठ बाल अभिनेता पुरस्कार’ देऊन
गौरविण्यात आले आहे. मात्र, साहिलने लहान वयात पुरस्कार मिळून ही जमीनीवर
पाय ठेऊन जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची धडपड सोडली नाही. कलेची साधना
करणे हिच एका महान कलाकाराची खरी ओळख असते.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी या म्हणीप्रमाणे साहिलने आपल्या
नृत्य व अभिनयाचा धडाका सुरु केला आहे. आज त्याच्या सादरीकरणामध्येच
त्याच्यात लपलेला भावी कलाकार रसिकांना दिसतो आहे. तशी दाद त्याला अनेक
वेळा मिळत ही आहे. जिथे संधी मिळेल तिथे हा बालकलाकार आपल्या कलेच्या
सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही. प्रचंड मेहनत,
चिकाटी, आत्मविश्वास, नविन शिकण्याचे धैर्य, साहस आणि जमीनीवर पाय ठेऊन हा
बालकलाकार रंगभूमीवर आपली दमदार वाटचाल करित आहे.
असा हा गुणी व गोड कलाकार त्याच्या भविष्यात उत्तुंग उंचीचा कलाकार
म्हणून जगासमोर यावा अशी धनकवडी- बालाजीनगर शिवजयंती महोत्सवतर्फे इच्छया व्यक्त करण्यात आली

