पत्रकार एस.एम.देशमुख म्हणजे झपाटलेलं झाडः भारतकुमार राऊत

Date:

पुणे दि.3 ( प्रतिनिधी ) पत्रकार एस.एम.देशमुख म्हणजे झपाटलेले झाडं आहे.पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी चळवळी उभ्या केल्या आणि पंधरा पंधरा वर्षे प्रश्‍नांचा पाठपुरावा करून प्रश्‍न तडीस नेले.हाती घेतलेल्या कामाचा यश मिळेपर्यंत झपाटल्यासारखा पाठपुरावा करण्याचा एसेम यांचा स्वभाव असल्याने त्यांनी हाती घेतलेले सर्व प्रश्‍न मार्गी लावल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळवून दिल्याबद्दल एस.एम.देशमुख यांचा पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने भारतकुमार राऊत आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते एक लाखाची थैली,मानपत्र,स्मृतीचिन्ह,पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला.यावेळी किरण नाईक यांनाही सन्मानित करण्यात आलं.त्यावेळी भारतकुमार राऊत बोलत होते.

ते पुढे म्हणाले,एस.एम.देशमुख यांनी केवळ पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठीच लढे उभारले असं नाही तर जनसामांन्यांच्या प्रश्‍नांसाठी देखील त्यांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली.कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी त्यांनी सातत्यानं सहा वर्षे संघर्ष केला,तो विषय मार्गी लावला,सेझ विरोधी लढयातही देशमुखांचा सहभाग होता.कोकणातील स्थानिक भुमीपुत्रांच्या हक्कासाठी अनेकदा देशमुख रस्त्यावर उतरले..खरं तर पत्रकारांचं हे काम नसलं तरी सभोवतालचे प्रश्‍न पाहून अस्वस्थ होणार्‍या देशमुख यांनी सामाजिक जाणिवा जपत हे प्रश्‍न हाताळले.त्यामुळं आम्ही त्यांना ‘कार्यकर्ता पत्रकार’ म्हणतो.अशा एका चळवळ्या पत्रकाराचा सन्मान पुण्यनगरीत होतोय याचा आनंद आणि अभिमान आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाला त्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत असंही भारतकुमार राऊत म्हणाले.यावेळी त्यांनी किरण नाईक यांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला..
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.कुमार सप्तर्षी यांनी देखील देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला.एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांचे प्रश्‍न हाती घेऊन सरकारला कायदे करायला भाग पाडले हे नक्कीच कौतूकास्पद आहे.आज पत्रकारितेबद्दल अनेक पध्दतीनं बोलले जात असताना देखील एस.एम.देशमुख यांच्यासारखे पत्रकार यशस्वी कसे होऊ शकतात याबद्दल मला आश्‍चर्य वाटते.देशमुख हे ध्येयवेडे पत्रकार असून सामाजिक कामं करणारा पत्रकार घडविण्याचे देशमुख याचं ध्येय मला कौतूकास्पद वाटते असे मत त्यांनी व्यक्त केलं.पत्रकाराच्या धर्माचं नाव ‘नेशन बिल्डिंग’ असं आहे.देशमुख हा धर्म प्रामाणिकपणे निभावत असल्याचे दिसते असे मतही कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.अनेक अडथळ्यांवर मात करीत देशमुख यांनी निर्धारानं आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल केली आणि अंतिमतः आपले ध्येय साध्य केल्याबद्दल त्यांनी देशमुख यांना धन्यवाद दिले.

सत्काराला उत्तर देताना एस.एम.देशमुख यांनी चळवळीतील आपले अनुभव सांंगितले.चढ-उतार सांगितले.मात्र निर्धार पक्का होता आणि कार्यकर्त्याला निराश होता येत नसल्यानं निराश न होता लढाई पुढं नेली आणि राज्यातील पत्रकारांच्या बळावर यश मिळविल्याचे स्पष्ट केले.पत्रकार संरक्षण कायद्याची लढाई अंत पाहणारी होती मात्र पत्रकारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्‍वासाच्या बळावर ती जिंकता आल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांनी सामााजिक जबाबदारीचं भान ठेऊन काम करावं,केवळ घडलेल्या बातम्याचे वृत्तांत देणं एवढंच पत्रकारांचं काम नाही तर लोकांचे प्रश्‍न,त्यांच्यावर होणारे अन्याय,अत्याचार याविरोधात आवाज उठविणे आणि प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका देखील पत्रकारांनी पार पाडली पाहिजे.याच भूमिकेतून कोकणातील पत्रकारांनी मुंबई-गोवा महार्माााच्या चौपदरीकरणाचा विषय हाती घेतला,त्याचा सहा वर्षे पाठपुरावा केला आणि अखेरीस तो तडीस नेला.हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊनच मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका संघ कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
चळवळीतील कार्यकर्त्याला अनेक कडू-गोड प्रसंगांना सामोरं जावं लागतं,अनेकदा आर्थिक स्थितीची सामना करावा लागतो.मात्र कार्यकर्ता असो किंवा पत्रकार त्यांनी जर आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या तर त्याला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही तो स्वाभिमानानं आणि निर्भयपणे जगू शकतो.मी याच भूमिकेतून काम केल्यानं मला कोणासमोर हात पसरण्याची वेळ आली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.पत्रकारितेतील नवीन संधी संपलेल्या आहेत,गेल्या अऩेक वर्षात एकही नवे दैनिक किंवा नवे चॅनल सुरू झाले नाही.उलट आहे तीच दैनिकं बंद पडत आहेत.नव्या तंत्रज्ञानामुळं माणसाची गरज कमी होत असल्यानं या संकटाशी कसा सामना करायचा याचा विचार पुढील काळात करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अरूण खोरे,निशिकांत भालेराव,देवेंद्र भुजबळ,आदिंची भाषणं झालं.किरण नाईक यांनीही सत्काराला उत्तर दिले.पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी आभार मानले.यावेळी परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी,परिषदेच्या मिडिया सेलचे राज्य निमंत्रक अनिल वाघमारे,परिषदेच्या महिला प्रमुख जान्हवी पाटील परिषदेचे अन्य पदाधिकारी विविध जिल्हयातील पदाधिकारी मोठया संख्येनं उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...