Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

Date:

पुणे- जिल्हा परिषद, पंचायत समिती शिरुर व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2018-19 नुकतेच दि. 21, 22 आणि 23 जानेवारी या कालावधीत बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुल शिरुर येथे संपन्न झाले.
या प्रदर्शनात दि. 21 जानेवारी रोजी विज्ञान दिंडी, शिक्षकांसाठी कार्यशाळा, जादुचे प्रयोग, कु.अंकिता नगरकर युवा शास्त्रज्ञ यांचे व्याख्यान, जल साक्षरतेचे पोस्टर प्रदर्शन, विज्ञान प्रश्न मंजुषा, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
तसेच प्रदर्शनात पाणी बचत, विज बचत, शेती तंत्रज्ञान, अन्नधान्य अधुनिक पध्दती, दळणवळण उर्जा बचत या विविध विषयांवरील विविध उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली. शिरुर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प पाहण्यासाठी बहुसंख्य शाळांतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाचा समारोप समारंभ दि. 23 जानेवारी 2019 रोजी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.सदाशिव(आण्णा) पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष श्री.दिलीपराव वळसेपाटील यांची कन्या कु.पुर्वा वळसेपाटील उपस्थित होत्या. या प्रसंगी मा.सभापती प्रकाश पवार, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाच्या संचालिका सौ.केशरताई पवार, सी.टी.बोरा शिरुर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सि.के.मोहिते, तहसिलदार भोसलेसाहेब, बी.डी.ओ. जठार साहेब, जि.प.सभापती सुजाताताई पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री.मानसिंग पाचुंदकर, पंचायत समिती शिरुरचे सभापती श्री.विश्वासराव कोहकडे, जि.प.सदस्य श्री.राजेंद्र जगदाळे, जि.प.सदस्या स्वाती पाचुंदकर, उपसभापती कुसुमताई मांढरे, जि.प.सदस्या सविताताई बगाटे, मा.सभापती मोनिकाताई हरगुडे, पं.स.सदस्या सौ.सविता प­-हाड, पं.स.सदस्या सौ.अरुणाताई घोडे, पं.स.सदस्य श्री.विजय रणसिंग, पं.स.सदस्य श्री.राजेंद्र गदादे, पं.स.सदस्य श्री.आबासाहेब सरोदे, पं.स.सदस्य डॉ.पोकळे, मा.पं.स.सदस्या दिपालीताई शेळके, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्याक्ष श्री.हरिश्चंद्र गायकवाड, मुख्याध्यापक संघ शिरुरचे अध्यक्ष श्री.शितोळे, सचिव श्री.मारुती कदम, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.रोहीदास एकाड, पुणे जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब राक्षे, विज्ञान पर्यवेक्षीका श्रीमती दिंडे, पं.स.शिरुरचे गटशिक्षणाधिकारी श्री.बाळकृष्ण कळमकर, सौ.वंदनाताई पवार, पै.राहुल पवार व श्री.बाबुराव उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रदर्शनामध्ये ए.जे.मलगुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली 11 परिक्षकांनी मुल्यमापण करण्याचे काम केले.
या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 6 वी ते 8 वी या गटामध्ये प्रथम क्रमांक रोहन राजाराम बरडे (व्हिल हेक्स – जवाहरलाल विद्यालय केडगाव ता.दौंडे), द्वितीय क्रमांक राघव अतुल कुलकर्णी (मेट्रो कार पार्किंग – लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे), तृतीय क्रमांक वंदना मारुती मेणे (स्मार्ट टोल नाका – ग्रा.वि.वि.भांबुर्डे ता.मुळशी), आदिवासी गट नरेंद्र दिनकर कारभळ (सौरभात झोडणी यंत्र – न्यु इंग्लिश स्कुल राजुन नं.1 ता.जुन्नर) यांनी विद्यार्थ्यांनी पटकावले.
तर इयत्ता 9 वी ते 12 वी या गटामध्ये प्रथम क्रमांक शुभम गणेश सोनार (चारचाकी वाहने चोरी रोखण्याचे यंत्र – भालचंद्र विद्यालय भांबोली, ता.खेड), द्वितीय क्रमांक अद्वैत गौरव बुरांडे (समुद्रातील पाण्याचे रुपांतरण – शिवराज विद्यामंदिर पुणे पुर्व), तृतीय क्रमांक आदित्य महेश शिरसाठ (घरगुती पाणी पंप – रामराव पलांडे माध्य. आश्रमशाळा मुखई ता.शिरुर) आदिवासी गट अंकिता नितीन खंडागळे (पाणी बचत स्मार्ट किट – आदर्श विद्यालय आंबोली ता.खेड) यांनी विद्यार्थ्यांनी पटकावले.
लोकसंख्या प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक सौ.योगिता रामचंद्र शिंगाडे (स्त्री पुरुष समानता – जि.प.प्रा.शाळा पाईट ता.खेड), द्वितीय क्रमांक सौ.सुनिता राजू वामण (लेक वाचवा देश घडवा – जि.प.प्राथ.शाळा कुसुर ता.जुन्नर), तृतिय क्रमांक श्रीमती मनिषा शशिकांत बारवकर (बेटी बचाव बेटी पढाओ – जि.प.प्राथ.शाळा पोम्बर्डी ता.भोर) यांनी पटकावले.
लोकसंख्या माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक श्री.महेंद्र दिक्षीत (लोकसंख्या शिक्षण – डी.ए.सातव हायस्कुल बारामती), द्वितीय क्रमांक श्री.दिलीप गंगाधर चौधरी (कशाला हवे आणखी मेल – महात्मा गांधी विद्यालय मंचर), तृतिय क्रमांक मनिषा श्रीरंग पवार लोकसंखेचे दुष्परिणाम – ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी ता.खेड) यांनी पटकावले.
शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटामध्ये सौ.मुलाणी झुबेदा मेहमुद (चौरस चेंडु बोर्ड – जि.प.प्रा.शाळा जे.पी.नगर इंदापूर), द्वितीय क्रमांक श्री.दिपक शिवाजी रेटवडे (ग्रीटींग टिचींग – जि.प.प्राथ.शाळा टाकळकरवाडी ता.खेड) यांनी पटकावले.
शैक्षणिक साहित्य माध्यमिक गटामध्ये श्री.अशोक बापुराव सोनवलकर (पेशींचे अंतरंग – सनब्राईट माध्य.विद्यालय आंबेगाव ता.हवेली), द्वितीय क्रमांक आर.एन.रांघवन (इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्युगिरेशन – ग्यानबा सोपानराव मोझे प्रशाला येरवडा पुणे पुर्व) यांनी पटकावले.
प्रयोगशाळा परिचर गटामध्ये श्री.केशव तुकाराम पवळे (होपचे उपकरण – आर.आर. विद्यालय भोर), द्वितीय क्रमांक श्री.चंद्रकांत दादाभाऊ घाटगे (सौर उर्जेवर हायड्रोजन वायूची निर्मिती व उपयोग – न्यु इंग्लिश स्कुल कांदळी ता.जुन्नर) यांनी पटकावले. सर्व यशस्वी स्पर्धकांना परितोषिक देवून गौरवण्यात आले.
प्राचार्य श्री.सी.के.मोहिते यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातील समस्यांचा वैज्ञानिक दृष्टीने विचार करुन नवनविन संकल्पना यावर विचार करावा व त्यातुनच उद्याचे वैज्ञानिक तयार होतील असा विश्वास तयार केला. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण दडलेले असतात त्यांना अशा प्रदर्शनामधून आपले विचार व्यक्त करण्याचे व्यासपिट मिळते असे सांगितले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी बालाजी शिक्षण संकुलातील सर्व स्टाफ, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघ, शिरुर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.संभाजी ठुबे, सचिव श्री.कल्याण कडेकर, खजिनदार श्री.दादाभाऊ घावटे, श्री.विलास कुरकुटे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन उपप्राचार्या सौ.स्वाती चत्तर, सौ.राजश्री नेमाणे, श्री.निलेश काळे व श्री.अनिल साकोरे यांनी केले. बालाजी प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.विनायक म्हसवडे, बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य श्री.गणेश मिटपल्लीवार व सर्व स्टाफने विशेष परिश्रम घेतले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...