पुणे- महापालिकेत आणि एकूणच पुण्याच्या राजकारणात आक्रमक म्हणून परिचित असलेल्या रमेश बागवे कुटुंबातील माजी नगरसेवक अविनाश बागवे आणि त्यांच्या पत्नी इंदिरा हे दोघे यावेळी महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत .स्वतः रमेश बागवे आणि त्यांच्या पत्नी जैनब बागवे तसेच मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते , चाहते , नागरिक यांनी रॅली काढली आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केले. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )व मित्रपक्षाच्या वतीने पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक २२ ड मधूनअविनाश रमेश बागवे तर अनुसूचित जाती महिला प्रभाग २२ अ मधून सौ.इंदिरा अविनाश बागवे यांनी आज आपले उमेदवारी अर्ज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सादर केले .
इंदिरा बागवे, अविनाश बागवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Date:

