पुणे –
मुख्य निवडणूक निरीक्षक श्री महिवाल साहेब यांनी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ करिता आज दि. ३०/१२/२०२५ रोजी पुणे महापालिका, मुख्य भवन येथे भेट दिली. या प्रसंगी त्यांचे स्वागत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आणि पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ तयारी बाबतची सविस्तर माहिती दिली.मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला आणि त्याबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर, व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक निरीक्षक महिवाल पुणे महापालिकेत
Date:

