तपोवनावर कुऱ्हाड चालणार नाही याची काळजी घ्या : डॉ. तारा भवाळकर

Date:

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : प्राथमिक स्तरावरील मुलांवर इतर भाषांचे ओझे, दडपण देऊ नये. मराठी व्यतिरिक्त इतर भाषांची सक्ती करणे अयोग्य आहे, असे मी मराठी भाषेची शिक्षिका असल्यामुळे अनुभवातून ठामपणे सांगत आहे, असा सल्ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी दिला. ग्रामीण, अर्ध ग्रामीण गावात नवीन मुले-मुली लिहिती झाली आहेत, तसेच नवीन प्रकाशक निर्माण होत आहेत, ही बाबही आश्वासक आहे. जेव्हा निरनिराळ्या जाती जमातीतील लोकं लिहायला लागतील तेव्हा त्यातील शब्द मराठी साहित्यात रुजतील आणि त्यातूनच मराठी भाषा समृद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. तारा भवाळकर बोलत होत्या. मराठी साहित्य परिषद, पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनतर्फे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी बोलताना त्यांनी अध्यक्षपदाच्या वर्षभरातील कार्याचा तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रियांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी विश्वास पाटील यांच्याकडे ९९व्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली.

माझ्या जडणघडणीत ग्रंथालयांचा मोठा सहभाग आहे, असे सांगून डॉ. तारा भवाळकर पुढे म्हणाल्या, मराठी भाषा देश, धर्म, जात याच्या पलीकडेच नव्हे तर ती महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचली आहे. मराठी माणूस जिथे जिथे गेला तिथे त्याने मराठीची रुजवण केली, याची दखल आपण घेणार आहोत की नाही? मराठी भाषेविषयी त्या म्हणाल्या, मी प्रमाणभाषा, शुद्ध, अशुद्ध, मंगल, अमंगल भाषा असे भेद मानत नाही. जुने असते ते सगळेच सोने असते किंवा नवे सगळेच टाकाऊ असते असे माझे मत नाही. सत्व ओळखणाऱ्या जाणकारांना या गोष्टी पटू शकतात.

आयुष्याच्या उत्तरायणाच्या काळात मला ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा अपघात होता. तो सन्मान महामंडळाने दिला. ९९व्या संमेलनाच्या अध्यक्षांची कारकीर्द आता सुरू होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचा आनंद झाला. पण आता प्रश्न आहे की, आपण मराठी भाषा साहित्य निर्मितीसाठी पायाभूत असे काही करणार आहोत की नाही?

९८व्या संमेलनात केलेल्या भाषणाविषयी त्या म्हणाल्या, ते भाषण फार गाजले. सर्वस्तरातील लोकांना ते आवडले. कारण माझ्या मते संस्कृती ही नेहमी समूहाची असते. समूहातील प्रत्येक व्यक्ती व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या भाषणातील विचार त्यांना आवडले कारण ते विचार त्यांचेही होते. मी फक्त त्यांच्या भावना अभिव्यक्त केल्या. त्यामुळे मी समूह मनाचा आवाज झाले.  

झाडे, वने टिकली तर पुढची पिढी टिकेल…

नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या वृक्षतोडीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, गोदावरी काठी असलेल्या तपोवनावर कुऱ्हाडी चालणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे, कारण प्रकृती टिकली तरच आपण टिकणार आहोत. आपण प्रकृतीचाच एक भाग आहोत. आपल्याला जगायचे असेल तर झाडे, वने टिकायला हवीत. झाडे टिकली तरच आपली पुढची पिढी जगेल हे समजायला हवे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...