पुणे- कोथरूड मधील माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार यांना भाजपात घेतल्यावर आता भाजपने नाकारलेले आणि अजितदादांच्या पक्षात गेलेले युवा नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भाजपा मधील दोन नेते राष्ट्रवादीत आणले आहेत . ज्येष्ठ नेतेआबासाहेब सुतार व युवा नेते शिवम आबासाहेब सुतार यांनी भारतीय जनता पार्टीला राम राम ठोकीत अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करत अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेद्वार गायत्रीताई कोकाटे-मेढे, पार्वतीताई निम्हण, अजयजी निम्हण उपस्थित होते.
कोथरूड भाजपातील २ नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीत
Date:

