पुणे- पुण्यात कॉंग्रेस पक्षाची जणू वाताहत सुरु आहे.जुन्या जाणत्यांना कोणी विचारत नाही आणि भाजपच्या नेत्यांच्या सल्ल्याने येथील कारभार सुरु असल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुस्लीम समाजातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ समजल्या जाणार्या कार्यकर्त्यांनी,ज्यांनी उभी हयात कॉंग्रेसला साथ दिली अशांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला.कॉंग्रेस पक्षाचे महापालिकेतील माजी उपमहापौर,स्थायी समिती अध्यक्ष अयाझभाई काझी व आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका बतुल काझी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज प्रवेश केला.यावेळी माजी सभागृहन नेते निलेश निकम,दत्ता बहिरट,राजू साने,विनोद आरसे उपस्थित होते.त्याच बरोबर माजी नगरसेवक आणि मुस्लिम बँकेचे व्हाईस चेअरमन आयुब भाई शेख यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते निखिल गायकवाड यांनी देखील प्रवेश केला.
कॉंग्रेसने दुर्लक्षित केले, मुस्लीम ज्येष्ठ कार्यकर्ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले…
Date:

