दिनांक 10 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार…
पुणे -क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने 29 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,निगडी, पुणे येथे राज्यस्तरीय युवा महोत्सव 2025-26 संपन्न झाला.वय वर्षे 16 ते 29 या वयोगटातील युवक- युवतींसाठी आयोजित केलेल्या या युवा महोत्सवात लोकगीत
या स्पर्धा प्रकारात उषाराजे हायस्कूलने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेत मुंबई विभाग,नाशिक विभाग, लातूर विभाग,अमरावती विभाग,पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपूर विभाग कोल्हापूर विभाग या विभागातून लोकगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेले संघ एकूण 8 संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.
कोल्हापूर विभाग सोडून इतर सात विभागातील सर्व संघातील विद्यार्थी हे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे होते.कोल्हापूर विभागाचा एकमेव संघ सर्वात कमी वयाचा म्हणजेच सर्व मुली सोळा वर्षांच्या होत्या.
उषाराजे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी युवती शाहीर श्रद्धा तानाजी जाधव हिने डॉ.आझाद नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बुलंद आवाजामध्ये आई अंबाबाईचा गोंधळ लोकगीत स्पर्धेत सादर केला.
कुमारी जान्हवी सागर कांबळे ( 11 वी कमला कॉलेज) , कुमारी पायल विशांत खोचीकर ( 10 वी इ), कुमारी लावण्या रवींद्र चव्हाण (10 वी ड), कुमारी कल्याणी दत्तात्रय चव्हाण (10 वी ड), कुमारी अनुष्का प्रकाश शिंदे (10 वी क ), कुमारी रुद्राक्षी प्रसाद हिरेमठ ( 10 वी फ) या सर्व विद्यार्थिनींनी सहगायनाची उत्तम साथ दिली.
कोल्हापूर विभागाच्या लोकगीत संघाच्या वादक साथीदारांनी आपल्या बहारदार वादनाने संपूर्ण राज्यातील कलाकारांना डोलायला लावले.
कोल्हापूर विभागातील गोंधळ गीताचे वादक विद्यार्थी कलाकार पुढीलप्रमाणे…
ढोलकीची उत्तम साथ देणारे श्री.रामदास नामदेव देसाई.
आपल्या संबळ वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केलेला कोल्हापूर विभागाचा वादक कलाकार व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल,पेठ वडगावचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी सांगलीचा पुत्र कुमार श्रेयश प्रवीण जाधव…
हार्मोनियमची उत्तम साथ दिलेला न्यू कॉलेज कोल्हापूर येथे बी.सी.ए. भाग 2 चे शिक्षण घेणारा विद्यार्थी कुमार ओम प्रसाद तारे.
उषाराजे हायस्कूलचे संगीत विभागप्रमुख व कोल्हापूर विभागाचे संघप्रमुख शाहीरविशारद डॉ.आझाद नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली उषाराजे हायस्कूलच्या लोकगीत संघाने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे डॉ.आझाद नायकवडी यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचा संघ व्यवस्थापक म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.
दिनांक 10 जानेवारी 2026 ते दिनांक 12 जानेवारी 2026 या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी उषाराजे हायस्कूलचा संघ 6 जानेवारी 2025 रोजी दिल्लीसाठी रवाना होणार आहे.
अभिमानाचा क्षण : दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी राज भवन,मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल दिल्ली येथे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या लोकगीत संघाशी संवाद साधून शुभेच्छा देणार आहेत.
उषाराजे हायस्कूलच्या यशस्वी संघाला ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले.
संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील ,उषाराजे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शोभा चौधरी , उपमुख्याध्यापिका वैशाली जमेनीस पर्यवेक्षक एस. एल.पुजारी या सर्व मान्यवरांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.

