पुणे- विनापरवाना नववर्ष स्वागतासाठी आयोजित पार्टी विरुध्द राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाने कारवाई करून
७२ तरुणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
आयुक्तडॉ. राजेश देशमुख व सह-आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे तसेच विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क सागर धोमकर यांच्या आदेशानुसार व अधीक्षक पुणे अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली .
दिनांक ३१/१२/२०२५ रोजी सुमारे २२.३० वाजता च्या सुमारास डिस्ट्रीक्ट चाईल्ड प्रोटेक्शन ऑफिसर यांच्याद्वारे मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीत, फ्लॅट नं. १०, ५ वा मजला, ओ बिल्डींग, लिबर्टी सोसायटी, कोरेगांव पार्क, पुणे येथे छापा टाकण्यात आला असता घटनास्थळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोणताही परवाना न बाळगता ७१ तरुणांची पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. सदरच्या ठिकाणी झडती घेतली असता दिल्ली राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य बकार्डी लेमन, ब्ल्यु रिबँड, रोमोनो क्लासिक बोडका, आयकोनिक व्हाईट, कोरोना एक्सट्रा, कार्ल्स बर्ग एलिफंट, किंगफिशर स्ट्रॉग बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. मद्य प्राशनाकरिता जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे ओम रविंद्र भापकर, वय २२ वर्षे, रा. सारंगा बिल्डींग पंढरीनगर, खराडी, पुणे याचे बिरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई), ६८ नुसार कारवाई करण्यात आली. सदरच्या ठिकाणी मद्य प्राशन करणारे एकूण ७१ युवक व युवतीं विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे ८४ नुसार कारवाई करण्यात आली. त्यापैकी एकुण ०९ संशयित हे अल्पवयीन आढळून आल्याने त्यांना बाल कल्याण समिती येथे हजर करण्यात आले.या गुन्हयामध्ये एकुण ७२ आरोपीवर कारवाई करण्यात आली असून एकूण ३३,५०५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. कारवाईमध्ये उपअधीक्षक संतोष बी. जगदाळे, निरीक्षकवसंत कौसडीकर, पी. आर पाटील, देवदत्त पोटे, दु. निरीक्षक नम्रता वाघ, रोहित माने, हितेश पवार, आनंद काजळे, स्वप्नील कदम, प्रियंका कारंडे, जवान श्रीधर टाकळकर, अमोल यादव, पूजा किरतकुडबे, जान्हवी शेडगे, गौरी शहाणे, सौरभपर्वतगोसवी, सचिन मांडेकर, विजय विंचूरकर, स्नेहा कांबळे, भरत नेमाडे, खुशी ओझा, वृषाली गद्रे, मोनिका कोतवाल, सचिन साळुंखे, पंडित तायडे, अभिजित बोंगरले यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे. पुढील तपास निरीक्षक वसंत कौसडीकर हे करत आहेत. .
पुणे जिल्हयामध्ये कोणत्याही नागरीकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री संबंधित माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री, क्र.१८००२३३९९९९ व दुरध्वनी क्र. ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री. अतुल कानडे यांनी केलेले आहे.
कोरेगाव पार्क मध्ये नववर्ष स्वागतपार्टीवर छापा: ७२ तरुण पकडले
Date:

