राहुल नार्वेकरांवर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप, आयोगाने अहवाल मागवला

Date:

मुंबई- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नाहीत, असा गंभीर आरोप राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत आयोगाने संबंधित प्रकरणावर तातडीने पावले उचलत पालिका आयुक्तांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. याच दिवशी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक, बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्ज प्रक्रियेदरम्यान राहुल नार्वेकर स्वतः उपस्थित होते. याच उपस्थितीवरून वादाला तोंड फुटले आहे. इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आरोप केला आहे की, नार्वेकर यांच्या उपस्थितीमुळे दबावाचं वातावरण निर्माण झालं आणि काही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आलं.

या प्रकरणी काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. अर्ज भरायला आलेल्या उमेदवारांना धमकावण्यात आलं, तसेच निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात आला, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी तर यावर अधिक गंभीर आरोप करत सांगितले की, इतर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून राहुल नार्वेकर यांना आपल्या नातेवाइकांना बिनविरोध निवडून आणायचे होते. त्यामुळेच हा दबावाचा प्रकार घडल्याचा त्यांचा दावा आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत तपासाची दिशा निश्चित केली आहे. अर्ज दाखल करतानाचे उमेदवारांचे व्हिडीओ फुटेज, त्या वेळी उमेदवारांसोबत कोणकोण उपस्थित होते, राहुल नार्वेकर नेमक्या कोणत्या कारणासाठी तिथे आले होते, त्यांनी प्रत्यक्षात उमेदवारांना धमकावले का, तसे असेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणती खबरदारी घेतली, आणि जर धमकावणे झाले नसेल तर तात्काळ कार्यवाही का झाली नाही, या सर्व मुद्द्यांची सखोल तपासणी केली जाणार आहे. आयोगाने यासंदर्भात पालिका आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवला असून, पुढील कारवाई त्यावर आधारित असणार आहे.

या संपूर्ण प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र आरोप ठामपणे फेटाळले आहेत. आपण कोणालाही धमकावले नाही किंवा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केलेला नाही, असा त्यांचा दावा आहे. विरोधकांकडून केवळ राजकीय हेतूने हे आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, जेव्हा विरोधकांना स्वतःचा पराभव दिसू लागतो, तेव्हा अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून पराभवाची कारणे शोधली जातात. हा प्रकारही त्याचाच भाग असल्याचं त्यांनी सांगितलं.

नार्वेकर यांनी विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की, या गटाकडून असे आरोप अपेक्षितच होते. कारण निवडणुकीत आपली स्थिती कमकुवत होत असल्याचे लक्षात आल्यावरच असे आरोप पुढे येतात. त्यामुळे या आरोपांना कोणताही तथ्याधार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच वागलो असून, निवडणूक आयोगाच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाचा अहवाल काय निष्कर्ष काढतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तक्रारींमध्ये तथ्य आढळले, तर निवडणूक प्रक्रियेतील गंभीर उल्लंघन म्हणून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आरोप निराधार ठरल्यास विरोधकांच्या राजकीय डावपेचांवरही प्रश्न उपस्थित होतील. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत हे प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत या वादावर निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोरेगाव पार्क मध्ये नववर्ष स्वागतपार्टीवर छापा: ७२ तरुण पकडले

पुणे- विनापरवाना नववर्ष स्वागतासाठी आयोजित पार्टी विरुध्द राज्य उत्पादन...

लाडक्या बहिणींना फटका! :67 लाख महिला योजनेच्या लाभापासून वंचित

मुंबई- “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२५...

पुण्यात मध्यरात्री एमपीएससी विद्यार्थ्यांचा संताप थेट रस्त्यावर:PSI भरती जाहिरात उशिरा, वयोमर्यादेसाठी आंदोलन

पुणे-राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा संयम आता सुटू लागल्याचं...

विधानसभा अध्यक्षांवरच धमकीचे आरोप :30 तारखेचं CCTV फुटेज गायब;आक्रमक संजय राऊत म्हणाले- शिंदेंच्या घरी RO कसे?

मुंबई-राहुल नार्वेकर यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची...