2 गँगस्टरच्या सौभाग्यवती पुण्याच्या निवडणूक रिंगणात,पहा त्यांनी वयाच्या कितव्या वर्षी किती केले शिक्षण पूर्ण…अन् उत्पन्न किती?

Date:

पुणे : गँगस्टर गजानन मारणे हा गँगस्टर म्हणून कुख्यात आहे तर शरद मोहोळ हा गँगस्टर होता. त्यांच्यावर अनेकदा मोक्का पासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल झाले. त्यांना स्थानबद्धही करण्यात आले. असे असताना त्यांच्या पत्नी मात्र याच काळात शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी वयाच्या चाळीशी आणि पन्नाशीमध्ये शिक्षण घेतल्याचे आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याचे समोर आले आहे.
गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे या यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी महापालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक १० बावधन-भुसारी कॉलनी येथून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची जन्मतारीख २४ एप्रिल १९७४ असून सध्या त्यांचे वय ५१ वर्षे ८ महिने आहे. त्यामध्ये त्यांनी आपली शैक्षणिक अर्हता एस वाय बी ए अशी असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून १७ जून २०२५ रोजी उतीर्ण झाल्याचे नमूद केले आहे. एका बाजूला त्यांचे पती गजानन मारणे हे टोळीप्रमुख म्हणून सर्वत्र ओळखले जातात. त्यांच्यावर आतापर्यंत ३२ हून अधिक गुन्हे दाखल होते. कोथरुडमधील आयटी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली. त्याच काळात जयश्री मारणे यांनी जून २०२५ मध्ये एस वाय बी ए उतीर्ण झाल्याचे नमूद केले आहे.गॅगस्टर शरद मोहोळ यांचा त्यांच्याच टोळीतील गुंडांनी जानेवारी २०२४ मध्ये गोळ्या झाडून खुन केला होता. शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ या प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर येथून भाजपकडून निवडणुक लढवत आहेत. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार स्वाती मोहोळ यांची जन्म तारीख १० सप्टेंबर १०८५ असून त्या सध्या ४० वर्षाच्या आहेत. आपली शैक्षणिक अर्हता नमूद करताना त्यांनी अशोक विद्यालय येथून २०२३ मध्ये १० वी उत्तीर्ण केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार त्यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी १० वी उत्तीर्ण केल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी कातील सिद्दिकी याच्या खुन खटल्यातून शरद मोहोळ याची निर्दोष मुक्तता केली होती. त्याशिवाय अनेक खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणीचे गुन्हे शरद मोहोळ याच्यावर होते. यामुळे शरद मोहोळ याचे नेहमीच आत बाहेर सुरु असायचे. अशा वेळी स्वाती मोहोळ या वयाच्या ३८ व्या वर्षी १० उत्तीर्ण झाल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार दिसून येत आहे.

स्वाती मोहोळ यांच्यावर मुळशी तालुक्यातील मुठे गावात कृषि जमीन आहे. त्यांच्याकडे दोन मोटारी आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख ९९ हजार रुपये असून त्यांच्या कुटुंबाची जंगम मालमत्ता ३८ लाख रुपये असून स्थावर मालमत्ता १६ लाख आहे. एकूण मालमत्ता ५४ लाख ८ हजार रुपये आहे. त्यांच्यावर ३ लाख ८७ हजार रुपयांचे वाहन कर्ज असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...