पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन
पुणे,
केंद्र आणि राज्य सरकार माध्यमातून नागरिक हिताची अनेक विकासकामे शहरात झाली आहे. पुण्यात मेट्रो विस्तार, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणेसाठी अधिक इ बसेस, २४/७ पाणी पुरवठा, वैद्यकीय महाविद्यालय, पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गास मंजुरी, विमानतळ नवीन टर्मिनल, चांदणी चौक विस्तारीकरण, पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पुणेकर हे नेहमी विचार आणि कामाला साथ देतात त्याप्रमाणे मनपा निवडणुकीत नागरिक युतीला साथ देतील. केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि पुण्यात दमदार विकास कामे सुरू आहे. पुण्याला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूर्ण ताकदीने आम्ही मनपा निवडणूक लढत असून पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
बाजीराव रस्ता येथील भारत भवन याठिकाणी
पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, आगामी मनपा निवडणूक अनुषगाने पुणे भाजप मिडिया सेंटर सुरू करण्यात आले आहे.या मिडिया सेंटर माध्यमातून पुढील १५ दिवस पक्षाचे वतीने अधिकृत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येईल. भाजप ,शिवसेना आणि आर पी आय यांची निवडणुकीत युती आहे. भाजप आणि शिवसेना या पक्षांनी ठराविक जागेपेक्षा एबी फॉर्म अधिक उमेदवार यांना दिले आहे. युती टिकली पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यानुसार सर्व चर्चा प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ९२ महिला यांना उमेदवारी दिली आहे. महिला यांच्यासाठी ८३ उमेदवारी ५० टक्के आरक्षण नुसार दिले पाहिजे परंतु आम्ही अधिक महिला उमेदवारांना प्राधान्य दिले आहे.
शिवसेनाला १६ जागा देण्यास आम्ही तयार
भाजपचे १०५ नगरसेवक मागील निवडणुकीत होते आणि तरी आम्ही युती करणार सांगत होतो. शिवसेनेच्या कमी जागा असतानाही ते ठराविक संख्यापेक्षा अधिक जागा मागत होते. आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे युती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. उमेदवारी जागा बाबत मतमतांतर होते पण आता हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करत आहे. स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही म्हणून हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर गेला आहे. शिवसेना यांनी १५० एबी फॉर्म दिले असतील तर त्याबाबत मला देखील प्रश्न आहे त्यांनी अधिक फॉर्म का दिले. आम्ही शिवसेना यांना १६ जागा देण्यास तयार होतो. त्यावरील काही जागांचा प्रश्न असेल तर त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. आरपीआयला आम्ही ८ जागा सोडलेल्या आहे असे मोहोळ यांनी यावेळी सांगितले.
गुन्हेगारांना राजकीय स्थान नको
निवडणुकीत काही पक्षाकडून गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना उमेदवारीचे वाटप झाले आहे याबाबत मोहोळ म्हणाले,गुन्हेगार यांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही सकारात्मक नाही. वार्ड क्रमांक 38 मध्ये रोहिदास चोरघे यांच्या पत्नी प्रतिभा चोरघे या अनेक वर्ष सामाजिक काम करत आहे. पालकमंत्री सांगतात की, शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे पण त्यांची शहरातील उमेदवारी यादी पाहिले तर कोणत्या तत्त्वात हे बसते त्यांनी सांगावे. चोरघे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मला माहिती नाही. परंतु गुन्हेगार यांना राजकारणात स्थान नसावे. दुसऱ्या पक्षाने गुन्हेगारांना उमेदवारी दिली परंतु आम्ही दिली नाही. पुणेकर पाहत आहे की ,नेमकी कोणाला उमेदवारी दिली गेली आहे. मतपेटी मधून त्याचे उत्तर मतदार देतील. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर काम करत आहे.

