पुणे -नववर्षाच्या पुर्वसंधेला १६ अट्टल गुन्हेगारांवर तडीपार कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी येथे दिली . पोलिसांनी सांगितले कि,’
पुणे शहरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२५-२०२६ शांततेत पार पाडण्याकरीता व पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारी वृत्तीस आळा घालणे व गुन्ह्यांना प्रतिबंध करणेकामी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणेबाबत परिमंडळ ७कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले होते. सदर आदेशास अनुसरुन नववर्षाच्या पुर्वसंधेला परिमंडळ ७ कार्यक्षेत्रातील लोहगाव, विमानतळ, चंदननगर, खराडी, वाघोली, लाणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील १६ अट्टल गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५/५६ प्रमाणे तडीपार करण्यात आले आहे.
खालील सराईत गुन्हेगाराना पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन तडीपार करण्यात आलेले आहे.
अ.क्र.- पोलीस स्टेशन, -आरोपी नाव, -दाखल गुन्हेः-
१) चंदननगर पोलीस स्टेशन, विठ्ठल गोविंद बिरंगे, रा.लेन नं ०२, रामनगर वडगावशेरी, पुणे. गावठी हातभट्टी दारुविक्री करणे, जुगार खेळणे
२) वाघोली पोलीस स्टेशन, चेतन ऊर्फ आप्पा ग्यानबा देवकुळे, वय २५ वर्षे, रा. जे. जे. नगर, लेन नं.०६, नितीन गाडे यांच्याकडे भाडयाने वाघोली ता. हवेली जि.पुणे. दरोडा टाकणे, गरै कायदयाची मंडळी जमविणे, गंभीर दुखापत करणे, दहशत पसरविणे, मारहाण करणे, तोडफोड करणे
३) वाघोली पोलीस स्टेशन, यशवंत ऊर्फ सोन्या पंडीत जाधव, वय. २४ वर्षे, रा. गणपती मंदिरासमोर जाधववस्ती, भावडीरोड वाघोली, ता. हवेली जि. पुणे. गैरकायदयाची मंडळी जमविणे, गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे, तोडफोड करणे, विनयभंग करणे.
४) वाघोली पोलीस स्टेशन, गोविंद श्रीमंत सोट, वय २४ वर्षे, रा.शिव मल्हार सोसा. फलॅट नं.३०१ तळेरानवाडी रोड केसनंद ता. हवेली जि.पुणे. गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे, मनाई आदेशाचा भंग करणे,
५) लोहगाव पोलीस स्टेशन, अनिकेत उर्फ चिरक्या विजय थोरात, वय २२ वर्षे, रा. ममता सुपर मार्केटशेजारी दत्तमंदीर जवळ कलवडवस्ती, लोहगाव पुणे. विनयभंग करणे, बलात्त्कार करणे, अज्ञात बालकाचा विनयभंग करणे, बेकायदेशीरपणे अमली पदार्थ विक्री करिता जवळ बाळगणे.
६) लोहगाव पोलीस स्टेशन, माजीद हुसेन शेख, वय २१ वर्षे, रा. बिलाल मस्जिदशेजारी कलवडवस्ती, लोहगाव पुणे. गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे,
७) लोहगाव पोलीस स्टेशन, आकाश शरद करंडे, वय ३२ वर्षे, रा. गणपती चौक, राखपसरे वस्ती, लोहगाव पणे. बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ विक्री करिता जवळ बाळगणे, गावठी हातभट्टी दारु विक्री करणे,
८) विमानतळ पोलीस स्टेशन, सुरेश चंद्रभान खंडागळे, वय ३९ वर्षे, रा. सम्राट चौक यमुनानगर, विमाननगर पुणे. गावठी हातभट्टी दारु विक्री करणे, चोरी करणे.
९) चंदननगर पोलीस स्टेशन, हर्षल दिलीप जगताप, वय २० वर्षे, रा. निरामय हॉस्पीटल जवळ, गल्ली नं. ०१, वडगांवशेरी, पुणे. गैरकायदयाची मंडळी जमविणे, दुखापत करणे, मारहाण करणे,
१०) चंदननगर पोलीस स्टेशन, करण निवृत्ती तांबे ऊर्फ के. टी., वय २० वर्षे, रा. चौधरी वस्ती, ठुबे पठारेनगर, खराडी बायपास, चंदननगर पणे. संघटित टोळी बनवुन दुखापत करणे, तोडफोड करणे, मारहाण करणे, दहशत पसरविणे, अज्ञात बालकाचा विनयभंग करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे.
११) चंदननगर पोलीस स्टेशन, अविनाश भास्कर वाणी, वय २१ वर्षे, रा. खांदवेनगर, वाघोली पुणे. गैरकायदयाची मंडळी जमविणे, दुखापतकरणे, मारहाण करणे, घातक शस्त्रबाळगणे
१२) विमानतळ पोलीस स्टेशन, पारस सुखदेव जाधव, वय २१ वर्षे, रा. रुम नं. १११४, सी बिल्डींग एस. आर.ए. कॉलनी, विमाननगर पुणे. दुखापत करणे, मारहाण करणे, घातकशस्त्र बाळगणे, दहशत पसरविणे, तोडफोड करणे,
१३) खराडी पोलीस स्टेशन, लक्ष्मण रामा पवार, वय ३९ वर्षे, रा.स.नं.५६/३, सुर्यप्रकाशनगर, खराडी, पुणे. गावठी हातभट्टी दारु विक्री करणे,
१४) विमानतळ पोलीस स्टेशन, साहील सादीक शेख, वय २० वर्षे, रा. साईबाबा मंदीराचे शेजारी गल्ली नं. ०३, बर्मासेल, इंदिरानगर, लोहगाव पुणे. दुखापत करणे, मारहाण करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, दहशत पसरविणे, तोडफोड करणे,
१५) लोणीकंद पोलीस स्टेशन, प्रकाश आनंदा शेट्टी, वय ४८ वर्षे, रा. प्रभात कॉलनी, शंकर कलाटेनगर, वाकड, पुणे. देहव्यापार करून घेणे, व्यक्तीचा अपव्यापार करणे,
१६) विमानतळ पोलीस स्टेशन, महादेव सुभाष साठे, वय २५ वर्षे, रा.स.नं.१९९ यमुनानगर झोपडपट्टी सम्राटचौक, लेन नं.१२, विमाननगर, पुणे. मृत्यु किंवा गंभीर दुखापत घडवुण आणण्याचे प्रयत्नासहित जबरी चोरी करणे, चोरी करणे, घरफोडी करणे, दुखापत करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे,
परिमंडळ ७ कार्यक्षेत्रातील १०० हुन अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत.
वरील तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस स्टेशन किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२९९५४५४७ यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ७, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, यांनी सर्व नागरीकांना आवाहन केले आहे.

