उमेदवारांच्या संपत्तीच्या चर्चेत ‘या’ उमेदवाराच्या नावावर केवळ रुग्णवाहिका

Date:

ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेला ‘ श्रीमंत’ उमेदवार

पुणे-आलिशान गाड्या आणि झगमगाटाची चर्चा निवडणुकांच्या काळात नेहमीच ऐकू येते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यावर अनेक उमेदवारांच्या संपत्तीची महागड्या गाड्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्यात प्रभाग २५ मधील उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या नावावर असलेले एकमेव चारचाकी वाहन लक्ष वेधून घेत आहे आणि ते म्हणजे रुग्णवाहिका.

उमेदवारी अर्जासोबत घोषित केल्यानुसार बाप्पु मानकर यांच्या नावावर कोणतीही आलिशान चारचाकी नसून, त्यांनी केवळ एक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. त्यांच्या २४ तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गरजू नागरिकांच्या सेवेत ही रुग्णवाहिका कार्यरत असते. राघवेंद्र मानकर हे भाजपाच्यावतीने प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथून निवडणूक लढवत आहेत.

रुग्णवाहिकेसोबतच त्यांच्या नावावर एक दुचाकी वाहन आहे. दैनंदिन कामकाजासाठी ते प्रामुख्याने दुचाकीचाच वापर करतात. आलिशान गाड्या आणि ताफ्यांच्या राजकारणात हा साधेपणाचा दृष्टिकोन चर्चेचा विषय ठरत आहे.

याबाबत बोलताना बाप्पु मानकर म्हणाले, गुढीपाडव्याला वाहन खरेदीची परंपरा आहे. २०२३ साली आम्ही रुग्णवाहिका खरेदी केली आणि तीच माझ्या मालकीची एकमेव चारचाकी आहे. रुग्णसेवेच्या कामासाठी तिची आवश्यकता होती. यापुढेही गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सेवेसाठीच वाहन खरेदी करण्याचा मानस आहे. एक दुचाकी आहे, आणि शक्य तिथे त्यावरच फिरतो. त्यामुळे लोक भेटतात, प्रश्न समजतात. लांबच्या प्रवासासाठी मित्रांच्या वाहनांची मदत घेतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...