पुणे- केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्यातील भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना लक्ष केले, एकीकडे कोयता गैंग संपवा , गुन्हेगारी संपवा म्हणतात आणि पहा प्रत्यक्षात ते उमेदवारी कोणाला देतात , राजकारण्याची ती जबाबदारी आहे शेवटी पुणेकर त्यांना उत्तर देतील . याच बरोबर शिवसेना अवघ्या एका नगरसेवकाच्या जीवावर १६५ जागा लढायला निघाली होती.आमची अजूनही युती करायची इछ्या आहे आम्ही ९२ महिलांना पुण्यात उमेदवारी दिलीय . देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी युतीचा निर्णय घ्यावा तो आम्हास मान्य असेल . त्यांच्या निर्णयानंतर कोणी माघारी घ्यायच्या त्यांच्या AB फॉर्म माघारी घेण्यात येतील असेही ते म्हणाले. शिक्षणमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चाद्रकांत्दादा पाटील , संदीप खर्डेकर यावेळी उपस्थित होते.
पहा नेमके मुरलीधर मोहोळ काय म्हणाले

