कॉसमॉस संघाने पटकावले विजेतेपद

Date:

आंतरसहकारी बँक ‘सहकार करंडक महिला क्रिकेट स्पर्धा
पुणे, ता. ३० : गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यानंतर अदिती पंचपोरच्या नाबाद २५ धावांच्या जोरावर द कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने आंतरसहकारी बँक ‘सहकार करंडक महिला क्रिकेट स्पर्धेत राजगुरूनगर बँक संघावर सात फलंदाज राखून मात केली आणि विजेतेपद पटकावले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांतील महिलांसाठी आयोजित ही स्पर्धा बिबवेवाडीच्या यशवंत टर्फ सरसेनापती हैबतराव शिळीमकर विद्यालय येथे झाली. या एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत कॉसमॉस बँक संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. त्यामुळे राजगुरूनगर बँकेला ६ षटकांत ३ बाद ३६ धावाच करता आल्या. कॉसमॉस  बँक संघाने विजयी लक्ष्य २.४ षटकांतच पूर्ण केले.

विजेत्यांना असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव अॅड. सुभाष मोहिते, असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते.

संक्षिप्त धावफलक : अंतिम फेरी – राजगुरूनगर – ६ षटकांत ३ बाद ३६ (माधुरी देवतारसे १९, चैताली पाटोळे ७, श्रद्धा १-५) पराभूत वि. कॉसमॉस बँक – २.४ षटकांत बिनबाद ३७ (अदिती पंचपोर नाबाद २५, डिंपल साळुंखे नाबाद ९).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...