राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरात भाजपची तीन तिकीटे

Date:

आमदार पठारे यांच्या प्रभागातून तुतारी गायब

पुणे : भाजपा आमदार पुत्रांना डावलणाऱ्या भाजपकडून राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांच्या घरात तिघांना उमेदवारी दिली आहे. बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, त्यांची सून ऐश्वर्या पठारे तर बापू पठारे यांची भाची खांदवे या तिघांना भाजपने पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळेस सुरेंद्र पठारे यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार हे स्पष्ट झाले होते.

मात्र आज ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यावेळेस केवळ सुरेंद्र पठारेच नाही, तर बापू पठारे यांची सून आणि भाचीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. एकूणच काय तर पुण्यातल्या राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाच्या आमदाराने अशी फिल्डिंग लावली की भाजपने काढलेला तो आदेश देखील चालला नाही!

ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बापूसाहेब पठारे यांना आमदार केले, त्या पक्षाची ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ही निशाणी प्रभागातून गायब करण्याचे विशेष काम त्यांनी केले. तिकीटासाठी स्वत:च्या नातेवाईंना भाजपमध्ये पाठवल्याने बापूसाहेब पठारे यांच्यावर बरीच टीका होत आहे.

विद्यमान आमदार, मंत्री आणि खासदारांच्या मुलांना महापालिका निवडणुकीत तिकीट न देण्याचा आदेश भाजपच्या वरिष्ठांनी काढला. त्यानंतर पुण्यासह राज्यातील अनेक आमदार खासदार आणि मंत्र्यांची निराशा झालेली पाहायला मिळाली. विद्यमान मंत्र्यांनी आणि आमदारांनी आपल्या घरातले नातेवाईकांसाठी महापालिका निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून भाजपात जबरी फिल्डिंग लावली होती, पण वरिष्ठांच्या आदेशानंतर या सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा धुळीत मिळाल्या. मात्र याला अपवाद ठरले ते पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे!विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना त्यांनी नातेवाईकांच्या तिकीटांची जुळवाजुळव केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...