पुणे:पुणे महापालिका निवडणुकीच्या अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी ठाकरे यांच्या शिवसेने कडून ५२ उमेदवारांना एबी फाॅर्म वाटप करण्यात आले, अशी माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली. तसेच शिवसेनेच्या कोट्यातील २३ जागा मनसेला देण्यात आल्या.
यामुळे शहरात काॅंग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अशी आघाडी झाली आहे.
महापालिका निवडणुकीत शहरात शिवसेना काॅंग्रेस आणि मनसे सोबत आल्याने शिवसेनेची ताकद काही प्रमाणात वाढली आहे. शिवाय शेवटच्या दिवशी कात्रज भागातील राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही कार्यकर्ते यांनी शिवसेना प्रवेश केला. एकीकडे पक्षाला गळती सुरू असताना काॅंग्रेस आणि मनसेसोबत आल्यामुळे आघाडी भक्कम झाली आहे. अर्ज दाखल करणाच्या शेवटचे दिवस असल्याने ज्या उमेदवाराला फाॅर्म देण्यात आले आहे, त्यांनी उत्साहाने अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होते.. ५२ एबी फार्म वाटले तरी अंतिम फायनल यादी ३ जानेवारीनंतरच कळणार आहे

