देशभर मोफत लसीकरण मोहीम राबवा, बेरोजगारांना मासिक 6 हजार रुपये द्या

Date:

नवी दिल्ली –केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पासाठी खर्च केली जात असलेली रक्कम हे काम थांबवून आरोग्य क्षेत्रासाठी वापरावी, बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये द्यावेत, अशा एकूण ९ मागण्यांचे खुले पत्रलिहिले आहे. या खुल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह १२ विरोधी पक्षनेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही यात आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीही काही सल्ले दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे परिणाम आता देश भोगत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

विरोधी पक्षांच्या मागण्या

  • देशांतर्गत किंवा विदेशातून शक्य तेथून लस खरेदी करण्यात यावी.
  • संपूर्ण देशात मोफत लसीकरण मोहीम तत्काळ सुरू करण्यात यावी.
  • देशांतर्गत लसनिर्मितीसाठी परवाना बंधनकारक करण्यात यावा.
  • लसीसाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.
  • सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर बंदी आणावी. यासाठी वापरला जाणारा पैसा लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरावा.
  • पंतप्रधान निधीसह इतर सर्व खासगी निधीतील पैसा वैद्यकीय उपचारांसाठी, उपकरणांसाठी वापरावा.
  • बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये देण्यात यावेत.
  • सर्व गरजूंना मोफत धान्य पुरवावे.
  • कृषी कायदे मागे घ्यावेत. जेणेकरून महामारीत फटका बसलेले लाखो शेतकरी देशातील जनतेसाठी अन्नधान्य उत्पादन करू शकतील.
  • १२ विरोधी पक्षांची पंतप्रधानांकडे मागणी, निधीच्या वापराबाबतही केल्या सूचना
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किरीट सोमैयांच्या ‘अतिरेकी आरोपांवर’ नाशिक पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांनी खुलासा करावा

काँग्रेसची मागणी ..सोमैयांनी ‘अतिरेक्यांची संख्येसह असणारी माहीती’ पोलीसांकडे का...

‘बाई पण भारी देवा’ स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा कार्यक्रम

तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे१ मार्च रोजी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन पुणे, दि.२४...