पुणे- पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अवयव दानाच्या चळवळीने गती मिळविली असून मरणोत्तर अवयव दान आणि प्रत्यारोपण यामध्ये रुबी हॉल महाराष्ट्रात अग्रेसर राहिले आहे . अवयव दान याबाबतचे गीअर्समज दूर करणे आणि अवयव दानाचे महत्व पटविणे यासाठी येत्या २५ जून रोजी सायंकाळी साडेसह वाजता गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात प्रत्यारोपणावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील ३ डॉक्टरांवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली रुबी हॉल मध्ये एकूण यकृत प्रत्यारोपणाच्या २८ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या . प्रत्यारोपण बाबत माहिती घ्यावी यासाठी नागरिकांनी ‘अवयव आरोपण -आयुष्यातील नवीनआशा ‘ या परिसंवादाला जरूर उपस्थित राहून शंका निरसन करवून घ्यावे असे यावेळी डॉ. प्राची साठे आणि डॉ . शितल महाजनी यांनी सांगितले
नेमके ते काय म्हणाले ते पहा -ऐका ...
पुण्यात अवयवदानाची चळवळ गतिमान — रुबी हॉल सर्वाधिक अग्रेसर
Date:

