पुणे आणि पिंपरी- चिंचवड मनपा निवडणुकीसाठी डॉ. उज्ज्वला हाके यांची रासप प्रभारीपदी नियुक्ती
पुणे :
पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीसाठी डॉ. उज्ज्वला हाके यांची रासप (राष्ट्रीय समाज पक्ष) प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे . पक्षाचे अध्यक्ष ,कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी ही नियुक्ती केली आहे .
डॉ. उज्ज्वला हाके यांना पुण्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा २५ वर्षांचा अनुभव आहे .राष्ट्रीय समाज पक्ष च्या प्रदेश सचिव म्हणून त्या कार्यरत आहेत . दोन्ही मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संभाव्य उमेदवारांची तयारी केली आहे .