कोविद- 19 विरोधात लढा गोदरेज समूहाकडून 50 कोटी रुपयांचा निधी

Date:

मुंबई–संपूर्ण देशापुढे आव्हान निर्माण करणाऱ्या, लाखो लोकांच्या आयुष्यावर तसेच जगभरातील सर्व देशांवर परिणाम करणाऱ्या करोना विषाणूच्या साथीवर मात करण्याच्या प्रयत्नात गोदरेज समूह भारतीय नागरिक व सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही आमचे ग्राहक, कर्मचारी, समाज आणि देश, विशेषतः आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि ही साथ रोखण्यासाठी अविरत काम करणाऱ्या प्रत्येकाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत करणार आहोत.असे गोदरेज समूहाच्या वतीने सांगण्यात आले .

 त्यांनी पुढे असेही म्हटले आहेकी ,त्याचीच सुरुवात म्हणून आम्ही भारतातील सामाजिक व मदत उपक्रमांसाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. ही प्राथमिक मदत असून कालांतराने आणखी मदत करण्याचा विचार आहे.

हा निधी पुढील सार्वजनिक आरोग्य उपक्रम आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी तसेच पुढील महिन्यांत लागणार असलेल्या अतिरिक्त कामांसाठी दिला जाणार आहे.

वैद्यकीय उपकरणे आणि संरक्षक वस्तूंचा पुरवठा

करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या म्हणजेच देशातील एकूण रुग्णांपैकी 21 टक्के रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात आम्ही काम सुरू केले आहे. आम्ही हळूहळू इतर राज्यांतही काम सुरू करणार आहोत.

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी (बीएमसी) वैद्यकीय उपकरणे आणि संरक्षक वस्तूंची खरेदी व पुरवठा
  • बीएमसीला 5 कोटी रुपयांचे दान
  • महाराष्ट्र सरकार हॉस्पिटलसाठी 115 हॉस्पिटल बेड्स दान
  • सेव्हन हिल्स हॉस्पिटल, अंधेरी येथे 75 बेड्सचे क्वारंटाइन केंद्र उभारण्यासाठी मदत·        बीएसमी आणि ठाणे महानगरपालिका (टीएमसी) यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात गोदरेज प्रोटेक्ट श्री. मॅजिक पावडर-टु-लिक्विड हँडवॉशचे (जगातील सर्वात किफायतशीर हँडवॉश) मोफत वितरण

    ·        आमच्या सीएसआरशी जोडलेल्या समाजाशी भागिदारीद्वारे 8 राज्यांतील 1.12 लाख लोकांना हँडवॉश, सॅनिटायझर्स आणि साबणाचे वाटप

    ·        मुंबई पोलिस दलाला सॅनिटायझर्स दान

    ·        साबण, हँडवॉश आणि सॅनिटायझर्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी क्षमतावाढीस चालना

    ·        विविध नेटवर्क्सद्वारे आणि हँडवॉश शिक्षण उपक्रमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचणे

    त्याचप्रमाणे आमच्या वैद्यकीय रेफ्रिजरेटर्स व्यवसायाचा, बांधकाम क्षमतांचा क्वारंटाइन खोल्या बांधण्यासाठी आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग सिस्टीममधील ज्ञानाचा हॉस्पिटलसाठी कसा उपयोग करता येईल व पर्यायाने देशाची मदत करता येईल याचा विचार करत आहोत.

    कारखाने आणि बांधकामाच्या ठिकाणी मदत

    कारखाने आणि बांधकामाच्या ठिकाणी कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

    भारतातील आघाडीची स्थावर मालमत्ता कंपनी या नात्याने आम्ही स्थलांतरित कामगारांपुढे असलेल्या तीव्र समस्यांविषयी चिंतित आहोत. त्यासाठी आम्ही पुढील प्रयत्न करत आहोत –

     –    8 शहरांतील आमच्या प्रकल्पांची ठिकाणे वारंवार सॅनिटाइझ केली जात आहेत तसेच तिथे आरोग्य तपासणी, खाद्यपदार्थ व स्वच्छतेच्या साधनांचा पुरवठाही केला जात आहे.

    –    आमच्या कामगारांच्या राहाण्याच्या ठिकाणी आयसोलेशन सुविधा तयार करण्यात आली असून जलद प्रतिसाद मिळावा यासाठी आमच्या लोकांच्या गरजांवर बारीक देखरेख केली जात आहे.

    या प्रयत्नांच्या मदतीने आम्ही सुरक्षा, तळमळ, संकल्पना आणि मेहनतीच्या जोरावर (जरी ते खूप दूरवर असले तरी) आमचे काम करत राहाणार आहोत, ज्यामुळे या संकटातून आणखी मजबूत होऊन बाहेर पडता येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...