पुणे- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) च्या शहर युवक आघाडीच्या उपाध्यक्ष पदी विजय गौंडर यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आठवले साहेब म्हणाले की, तरूण कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी जोरदार काम करण्याची आवश्यकता असुन सर्वांनी तळागाळातील जनसामान्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे व त्या समस्या नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर पक्ष बांधणीसाठी तरूण कार्यकर्ते मोठय़ा संख्येने पक्षात सहभागी करू व पक्ष अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत विजय गौंडर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला एम.डी. शेवाळे , नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, असीत गांगुर्डे, हनुमंत साठे, महेश शिंदे, संजय सोनवणे, अशोक शिरोळे, निलेश आव्हाड, आनंद जाधव, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते, तर सूत्रसंचलनाची जबाबदारी विजय देवीदास वाकचौरे यांनी पार पाडली.