धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध करण्याची ‘रिपाइं’ची मागणी

Date:

पुणे : राज्यात काही पक्ष, संघटनांकडून जाती-धर्मात तेढ निर्माण करून अशांतता पसरविण्याचा कुटील डाव रचण्यात येत आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांप्रमाणे पुणे पोलीस आयुक्तांनीही धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा कार्यक्रमांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) वतीने करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी यावर सकारात्मकता दर्शवत योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे. 
या मागणीचे निवेदन शुक्रवारी ‘रिपाइं’च्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना देण्यात आले. ‘रिपाइं’ शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, माजी अध्यक्ष अशोक शिरोळे यांनी गुप्ता यांची भेट घेऊन अशा कार्यक्रमांना परवानगी न देण्याची आग्रही मागणी केली.
मशिदीच्या परिसरात अजानच्या वेळेला कुठल्याही प्रकारची भक्तीगीते, प्रार्थना किंवा धार्मिक तेढ निर्माण होणारे कार्यक्रम साउंडवर लावण्यास बंदी घालावी. तसेच स्पीकरवरून अजान म्हणताना त्याचाही आवाज घालून दिलेल्या मर्यादेत असावा. राजकीय वक्तव्य, प्रक्षोभक भाषणे करण्यास प्रतिबंध घालावा. दोन समाजात वाद निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि धर्मनिरपेक्षतेचे, शांततेचे जतन करावे, असे आवाहन ‘रिपाइं’च्या वतीने निवेदनाद्वारे केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...