सातव्या गोवर्धन सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2020 स्पर्धेत रॉयल्स संघाला विजेतेपद

Date:

पुणे: आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेतर्फे सातव्या गोवर्धन सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2020 स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत रॉयल्स संघाने पीएचएम टायगर्स संघाचा सर्व 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.

कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत निपुन भंडारीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर रॉयल्स संघाने पीएचएम टायगर्स संघाचा सर्व 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.  पहिल्यांदा खेळताना अक्षय ओकच्या 46 धावांसह पीएचएम टायगर्स संघाने 10 षटकात 3 बाद 86 धावा केल्या. 86 धावांचे लक्ष  निपुन भंडारीच्या नाबाद 52 व सौरभ सानीच्या नाबाद 26 धावांसह  रॉयल्स संघाने 5.2 षटकात एकही गडी न गमावता 87 धावा करून सहज पुर्ण करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना करंडक पारितोषीक देण्यात आले. स्पर्धेचे पारितेषिक वितरण सेंट्रल काऊंसील मेंबर सीए चंद्रशेखर चितळे, माजी सेंट्रल काऊंसील मेंबर सीए झावरे,  डब्लूआयआरसी ऑफ आयसीएआयचे माजी उपाध्यक्ष सीए सर्वेश जोशी आणि पुणे विभागाच्या अध्यक्षा ऋता चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिजनल काऊंसील मेंबर सीए यशवंत कासार, सीए सुहास बोरा, अभय बोरा, सीए योगेश पोद्दार, सीए सुमेर शहा, सीए भुषण शहा, सीए सचिन परकाळे, सीए अल्पेश गुजराथी, सीए अमोल चंगेडीया, सीए अक्षय पुरंदरे, सीए आनंद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी

पीएचएम टायगर्स- 10 षटकात 3 बाद 86 धावा(अक्षय ओक 46(22), सागर ढवळे 2-20) पराभूत वि रॉयल्स- 5.2 षटकात बिनबाद 87 धावा(निपुन भंडारी नाबाद 52(17), सौरभ सानी नाबाद 26(15)) सामनावीर- निपुन भंडारी

रॉयल्स संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.

इतर पारितोषिके

सर्वेत्कृष्ट फलंदाज- रुद्रांग बलसेकर

सर्वेत्कृष्ट गोलंदाज- आयुष तिवारी

मालीकावीर- साहिल पारख

सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक – अक्षय ओक

सर्वेत्कृष्ट उदयोन्मुख खोळाडू- यश बोरा

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहरातून नऊ गुंड तडीपार:पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची कारवाई

पुणे- शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केट यार्ड परिसरात दहशत...

नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसुली सेवा गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर महसूलमंत्र्यांच्या हस्ते...