गुणवत्ता पुर्ण शिक्षण व संपुर्ण साक्षरते साठी रोटरी आणि पुणे जिल्हा परीषदेचा सामजस्य करार
पुणे- शिक्षण हा शाश्वत विकास होय, या सर्वांगीण विकासा साठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. पुणे जिल्ह्यात गुणवत्ता पुर्ण शिक्षणासह संपुर्ण साक्षरतेचे उद्दीष्ठ साध्य करण्यासाठी रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यात सामजस्य करार होत आहे, याचा मला अभिमान आहे. असे मत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिप कंद यांनी व्यक्त केले. यावेळी जील्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, प्रांतपाल प्रशांत देशमुख, रोटरीच्या साक्षरता समीती अध्यक्षा वैशाली भागवत उपस्थित होते.
या करारा बाबत अधिक माहिती देताना वैशाली भागवत यांनी सांगीतले कि, प्रांतपाल प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही पुणे जिल्हा संपुर्ण साक्षर करण्यासाठी हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत नव्या तंत्रज्ञानाच्या वापराचे कौशल्य प्रत्येक शिक्षकात विकसीत करणे, प्रत्येक प्रौढ अशिक्षिताला योग्य शिक्षण देवून सन्मानाने जगण्यास मदत करणे, प्रत्येक मुलाला शिक्षणासाठी प्रोस्ताहित करणे, प्रत्येक शाळेला ‘ आनंदी शाळा ‘ बनवणे अशा अनेक कार्यक्रमासाठी रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत पावले टाकली जात आहेत.
भागवत यांनी सांगितले की, या करारानुसार शिक्षकांच्या प्रशिक्षणा बरोबरच ज्ञानगंगा आनंदी शाळा उपक्रमा अंतर्गत 150 वाचनालये सुरु करणे, ‘ इच वन – रिच वन – टिच वन ‘ संकल्पने अंतर्गत जिल्हयातील पाच हजार प्रौढांना साक्षरतेचा मंत्र दिला जाणार आहे. त्याच बरोबर शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शंभर शिक्षकाना ‘ राष्ट्र उभारणी ‘ पुरस्कार देवून गौरवन्याची योजनाही या प्रकल्पात आहे.