Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ऋतु बसंत आये सतगुरु जग में,चलो चरनन पर सीस धरो री”

Date:

मुंबई-अखिल विश्व रा-धा-स्वा-ए-मी सत्संग परिवारातर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ‘निसर्ग वसंत पंचमी उत्सव’ आणि ‘राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन’ अनोख्या उत्साहात आणि भक्तिभावाने देशासह जगभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त रा-धा-स्वा-अ-मी सत्संग मुख्यालय दयाळबाग देशातील सर्व राज्यांत, आणि विदेशात असलेल्या विविध केंद्रांवर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, बाळ मेळावे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व वयोगटातील सत्संगी बांधव, भगिनी व मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. राधास्वामी सत्संग मुख्यालय दयालबाग आग्रा येथे रा-धा-स्व-ए-मी सत्संगचे मुख्य आचार्य प्रोफेसर प्रेम सरन सत्संगी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, रायगड, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात सत्संगी बंधू-भगिनींनी आपापल्या केंद्रावर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले.

यावेळी बोलताना श्री. पी.एस. मल्होत्रा (निवृत्त IRSME अधिकारी), प्रादेशिक अध्यक्ष, महाराष्ट्र आणि गुजरात प्रदेश म्हणाले की, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागातील १५ केंद्रांवर वसंत पंचमी उत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व केंद्रांवर सकाळच्या सत्संग व  शब्द पाठानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेत सत्संगी बंधू-भगिनी व बालकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण असलेल्या दयालबाग आग्राप्रमाणे येथेही निसर्ग वसंत पंचमी उत्सव हा सत्संगी बांधव, भगिनी आणि मुलांनी पर्यावरण प्रेमी म्हणून साजरा केला. सुरत, नागपूर आणि पनवेल येथील ठिकठिकाणी सत्संग हॉलचा परिसर नववधूप्रमाणे सजवण्यात आला होता. स्थानिक नागरिकांनीही ही मनमोहक सजावट पहाण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी बडोदा शाखेतील नवीन सत्संग कॉलनीच्या बांधकामाचा शुभारंभही करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमात पर्यावरण रक्षण व संवर्धनाची विशेष काळजी घेण्यात आली. सजावट आणि सजावटीसाठी मुख्यतः सौर उर्जेवर चालणारे एलईडी दिवे आणि बल्ब वापरण्यात आले. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या आणि वायूप्रदूषण करणाऱ्या दिव्या, मेणबत्त्या आदींचा अजिबात वापर करण्यात आला नाही. यावेळी आयोजित केलेल्या बाळ मेळाव्यांत फॅन्सी ड्रेस-शो, जिम्नॅस्टिक्स, ड्रॉईंग आणि पेंटिंग आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर्व श्रेणीतील विजेत्यांना भरघोस बक्षिसे देण्यात आली.

श्री पी एस मल्होत्रा यांनी सांगितले की सध्या राधास्वामी सत्संग संवत २००५ चालू आहे, आणि म्हणूनच यावर्षीच्या ‘रा-धा-स्वा-आमी’ सत्संगात वसंत पंचमी उत्सव कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे, या दिवशी राधास्वामी मठाचे पहिले आचार्य, परमपुरुष ‘पूरन धनी हुजूर स्वामीजी महाराज’  यांनी १५ फेब्रुवारी १८६१ रोजी जगउद्धारासाठी सर्वांनी सत्संगाचा मार्ग अवलंबला पाहिजे असा संदेश दिला. राधास्वामी मठाचे पाचवे आचार्य सर साहबजी महाराज यांनी २० जानेवारी १९१५ रोजी वसंत पंचमीच्या दिवशी आग्रा येथील ‘राधास्वामी सत्संग मुख्यालय’ दयालबागची पायाभरणी केली, जे आज संपूर्ण विश्वात आपल्या कार्यासाठी ओळखले जाते. तसेच १ जानेवारी १९१६  रोजी ‘राधा स्वामी एजुकेशनल इंस्टिट्यूट(आर‌ईआई) मिडल स्कूलची स्थापना करून शिक्षण आणि अध्यात्म यांचा उत्तम मेळ घालण्याचे कार्य केले आहे. दयालबाग एजुकेशनल इंस्टीट्यूट समविश्वविद्यालय (Dayalbagh educational institute deemed to be university) ही भविष्यात जगात आपले बलाढ्य  स्थान निर्माण करण्याच्यादृष्टीने वाटचाल करीत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त-सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या...

सरकारने विमान प्रवासाचे भाडे केले निश्चित

५०० किमी पर्यंत ७,५०० रुपये /५००-१००० किमीसाठी कमाल भाडे...

मुंबई विमानतळावर तुफान राडा..प्रवाशांचा सयंम सुटला

घराची चावी, पासपोर्ट बॅगेत… आता आम्ही काय करायचे?:बॅगा गहाळ...