सोशल इन्फ्लुएन्सर ऑफ इयर 2019 म्हणून सन्मान
भारतातील सामाजिक विकास उपक्रमांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांचा सन्मान
मुंबई: मुकुल महादेव फौंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांचा प्रतिष्ठेच्या एशिया बिझनेस लीडरशिप अवॉर्ड 2019 – सोशल इन्फ्लुएन्सर या पुरस्काराने, यूएईचे कॅबिनेट मेंबर व मिनिस्टर ऑफ टॉलरन्स शेख नाहायन यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी दिलेल्या उल्लेखनीय, नावीन्यपूर्ण व ऐतिहासिक योगदानासाठी त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आरोग्य, शिक्षण, युवक व क्रीडा या क्षेत्रांमध्ये लोकांच्या विकासासाठी मापदंड उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचीही या समारंभात दखल घेण्यात आली.
एशियन बिझनेस लीडरशिप अवॉर्ड दुबईतील जुमेराह एमिरेट्स टॉवर्स हॉटेल येथे 6 नोव्हेंबर 2019 रोजी आयोजित केले होते. यामध्ये, प्रदेशाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या 15 जणांचा गौरव करण्यात आला.
या वेळी बोलताना, मुकुल महादेव फौंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांनी सांगितले, ‘यूएईमध्ये सोशल इन्फ्लुएन्सर पुरस्काराने माझा सन्मान होत असल्याचा अतिशय आनंद वाटतो. या गौरवासाठी मी एबीएलएफ ग्रँड ज्युरी व स्ट्रॅटेजिक अॅडव्हॉयजरी पॅनल यांची मी आभारी आहे. दूरगामी बदल करण्यासाठी आणि एक परंपरा निर्माण करण्यासाठी, समाजातील वंचित भागांच्या गरजा पूर्ण करणे, हा प्रभावी मार्ग असल्याचे आमच्या फौंडेशनला व एक व्यक्ती म्हणून मला स्वतःला वाटते. आम्ही हे काम दीर्घकालीन शाश्वत भागीदारीद्वारे करत आहोत. एबीएलएफसारख्या प्रतिष्ठेच्या व्यासपीठाने आमची दखल घेतल्याने आमच्या प्रयत्नांना आणखी प्रोत्साहन व बळ मिळणार आहे.
रितू छाब्रिया मुकुल महादेव फौंडेशनचे (एमएमएफ) नेतृत्व करत आहेत आणि आरोग्यसेवा, शिक्षण, सामाजिक कल्याण, जल संवर्धन व स्वच्छता या क्षेत्रांतील योगदानासाठी त्या प्रसिद्ध आहेत. आशा व आनंद पसरवून आणि निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवून, एमएमएफने लाखो जणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे आणि येत्या अनेक पिढ्यांसाठी हे काम करायची एमएमएफची इच्छा आहे.