पुणे -महापालिकेस उत्पन्न देणारी ठेकेदार नोंदणी कार्यपध्दती पुन्हा चालू करावी अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
या संदर्भात बागुल यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’महापालिकेच्या हददीचा वाढता विस्तार पाहता जायका प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, विकासकामे, देखभाल दुरूस्तीकामे, सातवा वेतन असे खर्च पाहता उत्पन्न वाढीसाठी विविध मार्ग अवलंबणे अत्यंत गरजेचे आहे.
पुणे महापालिकेत कंत्राटी पध्दतीने स्थापत्य, विदयुत, यांत्रिकी, टँकरने पाणीपुरवठा करणे व इतर कामे करणेसाठी इच्छुक असलेल्या ठेकेदारांना दक्षता विभागाकडून विविध नोंदणी वर्गाध्ये खात्याची शि\ारशीनुसार ठेकेदार नोंदणी करण्यात येते. अनेक वर्षांपासून ही कार्यपध्दती असून सदयस्थितीत ठेकेदार नोंदणी कार्यपध्दती मुख्य सभा, स्थायी समिती अथवा कोणत्याही समितीची मान्यता न घेता प्रशासनाने बंद केलेली आहे. पुणे महापालिकेच्या निविदांध्ये सहभाग घेणा-या ठेकेदारांची संख्या वाढून स्पर्धात्क पध्दतीने दर यावेत यासाठी जास्तीत जास्त ठेकेदार नोंदणी होणे आवश्यक असते. असे असताना पुणे महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा अन्य कोणत्याही शासकीय विभागाकडे पूर्व नोंदणीकृत असल्याचे वैध प्रमाणपत्र जोडल्यास पुणे महापालिकेच्या निविदेत सहभागी होता येईल असे स्पष्ट केले आहे.
अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेकडे ठेकेदार नोंदणी होवून निविदेत सहभागी होणारे नवीन ठेकेदार यांना आता अन्य शासकीय विभागांकडे नोंदणीकृत व्हावे लागेल, सबब नवीन नोंदणी करणारे ठेकेदार अन्य शासकीय यंत्रणेकडे \ी भरून नोंदणीकृत होतील, यामुळे पुणे महापालिकेचे ठेकेदार नोंदणीमधून मिळणारे उत्पन्न कायस्वरूपी आपण बंद केले आहे. ठेकेदार नोंदणी विभागाचे मागील ३ आर्थिक वर्षाचे उत्पन्न पाहता चालू आर्थिक वर्षात अंदाजे ५ कोटी रूपये उत्पन्न या विभागाकडून महापालिकेस मिळाले असते.
तरी जास्तीत जास्त ठेकेदारांची नोंदणी पुणे महापालिकेकडे होवून ठेकेदार नोंदणीकामी असणारी \ी वाढवून त्यामधून पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविणेसाठी अनेक वर्षांपासून चालू असलेली ठेकेदार नोंदणी कार्यपध्दती पूर्ववत चालू करावी आबा बागुल यांनी म्हटले

