रेमडीसिव्हरचा काळाबाजार : आतापर्यंत ९ गजाआड – मुख्य सूत्रधार कोण ?

Date:


रेमडीसिव्हरची विक्री करणा-या दोन भावांना केले जेरबंद

आतापर्यंत पुणे शहर पोलीसांकडुन ५ गुन्हे दाखल ९ आरोपी अटक
एकूण ९ रेमडेसिव्हीर इजेक्शनच्या बाटल्या जप्त

पुणे- रेमडीसिव्हर चा काळाबाजार पुण्यात नेमका होतो कसा ? नेमकी कोणकोणत्या कंपन्यातून गेली महिनाभर किती इंजेक्शने पुण्यात कोणा कोणाकडे आलीत ? कोणी याचा साठा करवून ठेवला आहे काय ? रेमडीसिव्हर चा काळाबाजार करणारा अगर करवून घेणारा कोणी सुत्राधार आहे काय? जो अजून पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आला नाही ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नसताना आज एक रेमडीसिव्हर इंजेकशन ची तब्बल २५ हजारांना विक्री करणाऱ्या दोघा भावांना पोलिसांनी गजाआड केले आहे. आतापर्यंत अशा काळाबाजार करणाऱ्या ९ जणांना पोलसांनी अटक केली आहे.

काल दिनांक १६/०४/२०२१ रोजी अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे यांना एक इसम
बालेवा डी परीसरात कोरोनाग्रस्तांवर उपचारसाठी वापरण्यात येणारे रेमीडेसिव्हीर हे इंजेक्शन काळाबाजाराणे २५,हजार रुपये किमतीस एक या प्रमाणे स्वतःचे आर्थिक फायदयाकरिता विक्री करित असलेबाबत माहीती मिळाली होती. हि माहिती त्यांनी युनिट ४ गुन्हे शाखा यांना दिली नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे
जमदाडे व अंमलदारांचे पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले. या माहिती बाबत औषध
निरीक्षक,अन्न औषध प्रशारान, पुणे यांना कळवुन त्यांचे मदतीने नियोजन करुन एक बनावट ग्राहक तयार केला. बनावट ग्राहकाचे मदतीने रेमीडेसीव्हीर इंजेक्शनची काळ्या बाजाराने प्रति इंजेक्शन २५,०००/- याप्रमाणे विक्री करणारा इसम नामे प्रदिप देवदत्त लाटे, वय-२५ वर्षे, धंदा-नोकरी, सध्या रा. मोझे कॉलेज जवळ, बालेवाडी, पुणे मुळ रा. मु.पो.बेलुरा, ता. जि. बीड यास मोटार सायकल व २ रेमीडेसिव्हीर इंजेक्शनसह ग्यानबा मोझे कॉलेज समोर, बालेवाडी पुणे या ठिकाणावरुन ताब्यात घेतले. सदर रॅकेट मध्ये त्याचा गाऊ नामे संदिप देवदत लाटे वय-२३ वर्ष याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संदिप यास औषधांबाबत न वितरकांबाबत असलेल्या ज्ञानाचा गैरवापर करुन स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी त्यांनी
सदरचा गुन्हा आहे. त्यांचे विरूद्ध सौ.जयश्री सवदती, औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी दिलेल्या तक्रारी वरुन चतुश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यापुर्वीही औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन, पुणे याव्या मदतीने गुन्हें शाखा पुणे शहर च्या
वेगगळया पथकांनी दि.११/४/२०२१ रोजी भारती पोलीरा रटेशन हददीत दत्तनगर कात्रज याठिकाणी दि.१२/४/२०२१ रोजी खडक पोलीस स्टेशन हददीत भ वानी पेठ पुणे येथे व दि.१४४/२०२१ रोजी लोणीकंद व चंदननगर पोलीस ठाणे हददीत रेमडेसिव्हीर इजेक्शनचा काळाबाजार करणा-या व्यक्तींविरुध्द कारवाया केल्या आहेत अशा प्रकारे आतापर्यत सदर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या व्यक्तींविरुद ५ गुन्हे दखल करुन ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे व ९ बॉटल जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ,अप्पर आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, . श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्तलक्ष्मण बोराटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व युनिट कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
रेमीडीसिव्हर इंजेक्शन च्या होणा-या काळा बाजार प्रकरणी पोलीरा आयुक्त पुणे शहर यांनी
विशेष मोहीम हाती घेतली असुन सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखेची पथके कार्यान्वित केलेली आहेत. रेमीडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची नागरिकांना माहीती असल्यास त्यांनी त्वरीत पुणे शहर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...