पुणे नवरात्रौ महोत्सवात 14 ऑक्टोबर रोजी कीर्ती शिलेदार यांच्यावरील चित्रफितीचे प्रकाशन

Date:

पुणे-27 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवामध्ये संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या संगीत रंगभूमीवरील वाटचालीवर आधारित ‘मम सुखाची ठेव’ या चित्रफितीचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. गुरुवार दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार भवन (कमिन्स हॉल), नवी पेठ, पुणे येथे आयोजित या कार्यक्रमात या चित्रफितीच्या निर्माती व दिग्दर्शिका दीप्ती भोगले आणि स्वत: कीर्ती शिलेदार उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘मराठी रंगभूमी, पुणे’ या संस्थेस 74 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त कीर्ती शिलेदार आणि ‘मम सुखाची ठेव’ चित्रफितीची निर्मिती व दिग्दर्शन केल्यानिमित्त दीप्ती भोगले यांचा विशेष गौरव पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे या कार्यक्रमात केला जाणार आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी दिली. पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कीर्ती शिलेदार यांची गायिका व अभिनेत्री अशी संगीत रंगभूमीवरील वाटचाल आणि त्यांचा स्वरप्रवास डिजिटल माध्यमाद्वारे रसिकांसमोर याद्वारे येत आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांनी स्थापन केलेल्या ‘मराठी रंगभूमी, पुणे’ या संस्थेचा वर्धापनदिन आणि कीर्ती शिलेदार यांच्या संगीत रंगभूमीवरील सहा दशकांची कारकीर्द असे दुहेरी औचित्य साधून या चित्रफितीची निर्मिती व दिग्दर्शन दीप्ती भोगले यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे इव्हेंट कोऑर्डिनेशन सुनील महाजन, निकिता मोघे तसेच नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, अमित बागुल, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर आणि राजू बागुल हे करणार आहेत. करोना परिस्थितीनंतरच्या निर्बंधांच्या अधीन राहून हा कार्यक्रम संपन्न होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...