पुणे: आरबीएल बॅँक देशातील सर्वांत वेगाने प्रगती करणारी खासगी क्षेत्रातील बँक आहे. या बॅंकेतर्फे शिक्षणासापासून वंचित राहणार्या मुलींसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी उम्मीद १ हजार किमी सायक्लोथाॅन हा उपक्रम आयोजिला जातो. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. ही रॅली ९ डिसेंबर रोजी पनवेल-उरन रोड, मुंबई येथून सुरू झाली असून सोलापूर मार्गे हैद्राबाद पर्यंत पोहोचणार आहे.
बॅंकेचे ह्युमन रिसोर्स प्रमुख, सीएसआर आणि इंटरनल ब्रॅंडिंगच्या शांता वल्लुरी गांधी म्हणाल्या, मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले तर त्यांना नेहमी चांगल्या संधी मिळतात आणि त्या समाजात मोठा बदल घडवून आणू शकतात. मुलींचे शिक्षण समाजात सकारात्मक बदल घडवतात ज्यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात टप्प्यांवर समान योगदान देऊ शकतील. या उपक्रमामुळे या बॅंकेला ‘अपनो का बॅंक’ नावाने देखील संबोधले जाते.
बॅंकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत, हैद्राबाद येथील उद्भव शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. ही शाळा झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण देण्याचे काम करते. यामध्ये ५२ टक्के मुलींचा समावेश आहे. ही शाळा आयआयएमएए अॅल्युमनी असोसिएशन हैद्राबाद चाप्टर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चालविली जाते.
उम्मीद १ हजार सायक्लोथॅान हा उपक्रम २०१४ मध्ये सुरू करण्यात आला. ही रॅली देखील मुंबई ते बैंगलोर अशी होती. या उपक्रमाद्वारे ज्या मुलांना डोळ्यांचा कर्करोग आहे त्यांना आधार देणे हा मुख्य हेतू होता.
सन २०१५ मध्ये झालेल्या मुंबई-दिल्ली सायकल मॅरेथाॅनमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी प्रचार करण्यात आला.