पुणे : सूटचे कापड आणि तयार वस्त्रे ह्यांच्या क्षेत्रातील अग्रणी निर्माता, वितरक आणि किरकोळ विक्रेता असलेल्या रेमंडने, आज पुण्यात अग्रणी पुढाकार घेऊन ग्राहकांना ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंगची म्हणजेच सानुकूल शिवणकामाची सेवा पुरविण्यास सुरुवात केली. ग्राहक आता घरबसल्या www.raymondcustomtailoring.com ह्या संकेतस्थळावरून ऑनलाईन भेटीची वेळ ठरवून चपखल शिवणीसोबतच वैयक्तिक आवडीची पूर्तता आणि निर्दोष कारागिरी अनुभवू शकतात.
आजच्या गतिमान जगात, दुकानातून एखादा कपडा उचलून घेताना तो चपखल बसणारा आणि एखाद्याची वैयक्तिक स्टाईल दर्शविणारा असेलच ह्याची काही खात्री देता येत नाही. पण रेमंडच्या कस्टमाइज्ड टेलरिंगच्या निमित्ताने पुरुषांना आता त्यांच्या सोयीच्या वेळ आणि स्थळानुसार ऑनलाईन भेटीची वेळ ठरवून शर्टस आणि ट्राउझर्समधील स्वत:ची विशिष्ट शैली तयार करणे सहज शक्य होणार आहे. स्टायलिस्टने कपड्याचे नानाविध नमुने घेऊन ग्राहकाच्या घरी भेट देण्यापासून ह्या प्रक्रियेची सुरुवात होते. चपखल मापे घेतल्यानंतर, ग्राहक आपल्या पसंतीनुसार वैयक्तिक आवडीनुसार कॉलर, कफ्स आणि इतर लहान-सहान तपशील सांगू शकतात; खेरीज आपली आद्याक्षरेही बनवून घेऊ शकतात.
कस्टमाइज्ड टेलरिंगच्या संकल्पनेबद्दल बोलताना सुटिंग व्यवसायाचे अध्यक्ष सुधांशू पोख्रीयाल म्हणाले की, “पुरुषांच्या कपड्यांतील उत्क्रांती आणि भारतीय पुरुषाचा आंतरराष्ट्रीय फॅशनकडे झुकणारा सूक्ष्मदर्शी कल पाहता, त्याचा अस्सलपणा दर्शविणारी सेवा देण्याची वेळ येऊन ठेपली होती. रेमंडची कस्टमाइज्ड टेलरिंग् सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करण्यात आलेली आणि स्वस्त किमतीत मिळणारी एक अनन्यसाधारण ग्राहक सेवा आहे. वेळेचे अत्यंत महत्त्व असलेल्या आजच्या जगात, रेमंड कस्टमाइज्ड टेलरिंग निर्भयपणे शिवलेले, स्टाईलिश कपडे तयार करून देण्याची सहजता दर्शविते जे तुमची स्टाईल दर्शवितात. ह्या सेवेस मुंबईतून भरघोस प्रतिसाद मिळाल्याने आता ही सुविधा पुण्यात देखील सुरू करण्यात आली आहे.”
रेमंडची कस्टमाइज्ड टेलरिंग सेवा अखंड खरेदीचा अनुभव देते आणि त्याचसोबत ग्राहकांना कपडे बनण्याच्या पूर्ण प्रक्रियेची वेळोवेळी माहिती मिळण्याची सोय करून देते. शिवून तयार झालेले कपडे आकर्षक पॅकिंगसह सात दिवसांच्या आत ग्राहकाच्या घरी पोहोचवण्यात येतात. पूर्वी केवळ हौसेची गोष्ट म्हणून ओळखले जाणारे कपडे आता रेमंडच्या ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंग सेवेमुळे स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीत म्हणजेच रु. ७४९ मध्ये शर्ट आणि रु. ८९९ मध्ये ट्राउझर असे मिळतात. ज्या ग्राहकांकडे आधीच घेतलेले कापड आहे ते देखील ह्या ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. १ जानेवारी २०१८ पर्यंत मुंबई आणि पुण्यात ग्राहक प्रास्ताविक सूट मिळवून पहिली मोफत चाचणी घेऊ शकतात; तसेच सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांत शिवण कामावर ५०% सूट मिळवू शकतात.