पुणे, 28 मे 2022: एसेस टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एनरझरलचे निखिल राव प्रायोजित पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पीएमडीटीए एसेस करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत रवी कोठारी, निखिल भगत, होझेफा हकीम, जस्मित सहानी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.
एसेस टेनिस अकादमी, उंड्री या ठिकाणी आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत अ गटात पहिल्या सामन्यात रवी कोठारीने सौरभ देशपांडेचा 5-0 असा तर दुसऱ्या सामन्यात रवी कोठारीने राज हिरेमठचा 5-0 असा पराभव केला. ड गटात होझेफा हकीमने प्रफुल आशेरवर 5-3 असा विजय मिळवला. इ गटात निखिल भगत याने अझहर जोदाटीला 5-1 असे पराभूत केले. ह गटात जस्मित सहानी याने भृमीस सुब्रमणियनला 5-1 असे नमविले.
निकाल: राउंड रॉबिन फेरी: गट अ: रवी कोठारी वि.वि.सौरभ देशपांडे 5-0; रवी कोठारी वि.वि.राज हिरेमठ 5-0; राज हिरेमठ वि.वि.सौरभ देशपांडे 5-1;गट ब: राहुल कोठारी वि.वि.योगेश नेगी 5-0;गट क: पंकज बोनीकर वि.वि.श्रेयश प्रसाद 5-3;गट ड: होझेफा हकीम वि.वि.प्रफुल आशेर 5-3;गट इ: अमन रैथथा वि.वि.सचिन कसमळकर 5-0; निखिल भगत वि.वि.अझहर जोदाटी 5-1;गट फ: अमित किंडो वि.वि.कवलजीत परदेशी 5-0;गट ह: जस्मित सहानी वि.वि.भृमीस सुब्रमणियन 5-1;
पीएमडीटीए एसेस करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रवी कोठारी, निखिल भगत, होझेफा हकीम, जस्मित सहानी यांचा बाद फेरीत प्रवेश
Date: