महाभारताच्या दाखल्यानुसार अस्तित्व दाखवण्याचा राऊतांचा केविलवाणा प्रयत्न, प्रविण दरेकर यांची टिका

Date:


मुंबई दि.१ जुलै – महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस व विसंवाद मोठ्या प्रमाणावर आहे. आघाडी करण्यामध्ये संजय राऊत यांचा महत्वाचा रोल होता. आता महाविकास आघाडी विस्कळीत होण्याच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे संजय राऊत भांबावलेले आहेत, अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
माध्यमांसोबत बोलताना दरकेर म्हणाले की, संजय राऊत यांच्या भूमिका प्रसंगानुसार बदलतात. ते सध्या अस्वस्थ आहेत. त्यामुळे महाभारताचे दाखले देत आपली भूमिका, आपले अस्तित्व कसे योग्य आहे तसेच भाजप किंबहुना केंद्र सरकार कशा पध्दतीने भूमिका घेत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडुन होताना दिसत आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला.
संविधानिक हक्क असल्यामुळे प्रत्येकाला तक्रार करायचा अधिकार
अनिल देशमुख यांच्या चौकशीबद्दल बोलताना दरेकर म्हणाले की, अशा प्रकारच्या तक्रारी नियमित होत असुन या तक्रारी मंत्र्यांच्या विरोधात किंबहुना प्रस्थापितांच्या विरोधात असल्याने याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते. देशामध्ये संविधानिक हक्क असल्यामुळे देशातील कोणताही नागरिक कोणावरही तक्रार करू शकतो. तपास यंत्रणा किंवा न्यायालयीन व्यवस्था योग्यपरीने आपले काम करीत असते. हे काही भाजप करत नसून समाजातील जो दबलेला आवाज आहे किंवा प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात बोलण्याचं धाडस होत त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी परमार नावाच्या व्यक्तीने देशमुख आणि राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असल्याचे दरकेर यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदीजींची भूमिका पालकत्वाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्येयाने पछाडलेलं नेतृत्व असुन लोकं टीका व आरोप करतात. परंतु टीका व आरोप केले जात आहेत म्हणुन पंतप्रधान मोदीजी जनतेला सेवा देण्याचं थांबत नसुन कोरोंना संकट काळात स्वतः नियंत्रण करत परिस्थिति हाताळत असतात, प्रत्येक गोष्टीत लक्ष देत जनतेसोबत संवाद साधत होते. आपल्या मंत्र्यांनी सुद्धा लसीकरणाची पाहणी करावी, केंद्रावर जावं, आणि लसीकरण सुरळीत होईल याकडे लक्ष द्यावे. या सर्वांची काळजी घेत पालकतत्वाच्या भूमिकेने पंतप्रधान देशवासियांना पाहत आहे हीच अभिमानाची गोष्ट आहे, असे दरेकर यांनी सांगतिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...

भारताला सेमिकंडक्टर स्वातंत्र्याची गरज-प्रा. डॉ. मंगेश कराड

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘सेमिकंडक्टर तंत्रज्ञानावर’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन पुणे : सध्या...

महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०२६: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा...