सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदळाचा गैरवापरासंबंधी आरोपी रेशन दुकानदारांना तात्काळ अटक

Date:

अलिबाग :- जिल्ह्यातील पनवेल तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या संयुक्त पथकाने दि.३१ जुलै २०२० रोजी टेक केअर- लॉजिस्टीक, पळस्पे, ता.पनवेल येथील पलक रेशन गोडावून येथे छापा टाकून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ११० मे.टन तांदूळ जप्त केला आहे. त्यानुषंगाने संबंधितांविरुध्द दि.०१ ऑगस्ट २०२० रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथे गुन्हा नोंद क्र. ०२७४/२०२०, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भा.द.वि.१२० (ब), ४२०, ४६५, ४६८,४७०,४७१, ३४ व सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश २०१५ चे कलम १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ६अ अन्वये जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे दि.१४ ऑगस्ट व ०४ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली होती. याबाबत पुढील अंतिम सुनावणी दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.

नवी मुंबई पोलिसांकडून प्राप्त अहवालानुसार प्रस्तुत गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला तांदूळ भारतीय खाद्य निगमच्या OPEN MARKET SALES SCHEME ( DOMESTIC ) (OMSS) (खुला बाजार विक्री योजना) (देशांतर्गत) मधील ई-लिलावाद्वारे घेतलेला असून निर्यातीवर बंदी असतानाही  विविध आफ्रिकन देशात हा तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. भारतीय खाद्य निगमच्या OPEN MARKET SALES SCHEME ( DOMESTIC ) (OMSS) या योजनेतील तांदळाचा वापर फक्त देशांतर्गत करण्यासच परवानगी असून या तांदळाच्याही निर्यातीस बंदी आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी हा तांदूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी यांच्याकडून खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या होत्या. मात्र ही कंपनी अस्तित्वात नसून सादर केलेल्या पावत्याही बनावट, बोगस असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. .

कर्नाटक राज्यातील इंडी, विजापूर, जि.विजापूर तसेच हल्लूर, ता.मुदलगी, जि.बेळगाव इत्यादी ठिकाणावरुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील हा तांदूळ निर्यातीसाठी आणला असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींच्या कंपन्यांमार्फत दि.१ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत ३२ हजार ८२७ मे.टन तांदूळ परदेशात निर्यात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त, नवी मुंबई यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे व नवी मुंबई गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकाऱ्यांचे ‘विशेष तपास पथक’ नियुक्त करण्यात आले होते. या  पथकाने कर्नाटक राज्यात जाऊन तेथील रेशन दुकानदारांना अटक केली आहे. गुन्हयाच्या तपासात आजपर्यंत एकूण १८ आरोपी निश्चित करण्यात आले असून त्यापैकी १) नवनाथ लोकू राठोड, वय-२५ वर्षे, रा.ठि.इंडी, विजापूर, कर्नाटक, २) सत्तार चांदसाहब सय्यद, वय-२५ वर्षे, रा.ठि. इंडिया, विजापूर, कर्नाटक, ३) कृष्णा दामो पवार, वय-४५ वर्षे, रा.ठि.जगदंबा मंदिराजवळ, हिरेबेनूर तांडा, ता.इंडी, जिल्हा-विजापूर, कर्नाटक या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या कारवाई अंतर्गत टेक केअर लॉजिस्टीक, पळस्पे, येथील पलक रेशन गोडावून, ता.पनवेल, येथून रु.३३ लाख किंमतीच्या रेशनच्या तांदळाच्या प्रत्येकी  ५० कि.लो. वजनाच्या २ हजार २२० गोण्या (११० मे.टन) यामध्ये एशियन राईस लोगो असलेल्या ६५२ पिवळ्या रंगाच्या व सफेद  रंगाच्या २९५ गोण्या त्याचप्रमाणे उर्वरित १ हजार २७३- फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेले बारदाना पोती व दोन वजन काटे, 2)झेनिथ इंम्पेक्स कंपनी खालापूर, ता.खालापूर, जि.रायगड येथून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेल्या बारदानाच्या रिकाम्या ८०८ गोण्या, 3)जय फूड प्रोडक्शन कंपनी, सावरोली, ता.खालापूर, जि.रायगड. या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरयाणा असे शिक्के असलेल्या बारदानाच्या रिकाम्या ८ गोण्या तर 4) जय आनंद फूड कंपनी, मिरांडे इंडस्ट्रीज, भादाणे गाव, पो.पडे, ता.भिवंडी, जि.ठाणे येथून रु.९९ लक्ष १२ हजार ०४६/- रूपये किंमतीच्या तांदळाची ५ हजार ४०४ व गव्हाची ८६० पोती अशी एकूण ६ हजार २६४ पोती जप्त करण्यात आली आहेत.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकामार्फत पुढील अधिक तपास सुरु आहे. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विशेष तपास पथकाला तपास जलद गतीने पूर्ण करुन गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...