पुणे- पवित्र मंत्राग्नीच्या साक्षीत …आकर्षक रांगोळीचा सडा …. फुलांची मन वेधून घेणारी सुवासिक आरास …. विविध प्रकारच्या मिठाईचा व पदार्थांचा प्रसाद … यशोदामैय्या व गोविंदाचा (श्रीकृष्णाचा ) जयघोषात बिबवेवाडी येथील महेश सांस्कृतिक भवनात रविवारी सायंकाळी ५ हजार नागरिकांनी उत्साहात पारंपरिक व धार्मिक पद्धतीने अन्नकोट महोत्सव साजरा केला. हि माहिती माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनचे सचिव शामसुंदर कलंत्री व सल्लागार संजय बिहाणी यांनी आज सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितली
माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशनतर्फे काल रविवारी सायंकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत बिबवेवाडी येथील महेश सांस्कृतिक भवनात अन्नकोट महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवास माहेश्वरी समाजातील बालांपासून, महिला, तरुण,तरुणी, ते जेष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर पुण्यातील अन्य नागरिक, प्रतिष्ठित नागरिकांनी या अन्नकोट महोत्सवास हजेरी लावून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. जेष्ठ उद्योगपती विठ्लशेठ मणियार, हिरालाल मालू, महेश सहकारी बँकेचे अध्यक्ष पुनमचंद धूत ,प्रदीप राठी,नगरसेवक वसंत मोरे, विशाल तांबे, साईनाथ बाबर,नगरसेविका गायत्री खडके, किशोर तोष्णीवाल , मुकुंददास लोहिया, रवींद्र राठी, संजय बिहाणी जितेंद्र राठी,पुणे माहेश्वरी संघाचे अध्यक्ष नरेंद्र चांडक,जवाहर बाहेती जुगल मालू,जुगल पुंगलिया,,भगवानदास लढ्ढा ,फौंडेशनचे सचिव शामसुंदर कलंत्री,कोशाध्यक्ष श्रीप्रकाश बागडी , विश्वस्त मंडळाचे विश्वस्त बालाप्रसाद बजाज , राजेंद्र भट्टड , हरी भुतडा , मदनलाल भुतडा,संजय चांडक , दिलीप धूत , संतोष लढ्ढा , विजयराज मुंदडा , भंवरलाल पुंगलिया , अशोक राठी , महेश सोमाणी , रामविलास तापडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून गोपी, गवळ्यांचे वरुणराजाच्या मुसळधार पावसाच्या बरसातीपासून संरक्षण केले होते. या काळात सर्वजण ७ दिवस उपाशी होते. त्या ७ दिवसांच्या कालावधीत यशोदामैया दररोज भोग (प्रसाद ) लावत होती. या घटनेच्या स्मृतीच्या आठवणी म्हणून माहेश्वरी समाजातर्फे दीपावलीच्या काळात दरवर्षी अन्नकोट महोत्सव आयोजित करण्यात येतो.
काल रविवारी सायंकाळी भगवान श्रीकृष्णाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली . त्यांनतर भगवान श्रीकृष्णा समोर करंजी , चकली, लाडू, मिठाई आदी विविध प्रकारच्या ५६ मिठाई ठेवून गोविंदा चा जयघोष करण्यात आला . यांनतर अन्नकोट महोत्सवास आलेल्या नागरिकांचे फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. नागरिकांनी देवाचे दर्शन घेऊन अन्नकोट महोत्सवाचा आंनद साजरा केला.