पुणे-सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात ब्रम्होत्सवानिमित्त काल मंगळवारी महालक्ष्मी , महाकाली , सरस्वती व विष्णु या देवतांच्या उत्सवमूर्तींची धान्यतुला करून सुमारे ५०० किलो धान्य कोथरूड येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेस भेट (देणगी) देण्यात आले. त्याचबरोबर या संस्थेतील विद्यार्थ्यांची संगीताची आवड लक्षात घेऊन त्यांना रोलँड कंपनीचा इलेक्ट्रॉनिक कि बोर्ड (इलेक्ट्रॉनिक वाद्य )हि भेट दिले.
महालक्ष्मी मंदिराच्या ब्रम्होत्सवानिमित्त सोमवार दिनांक २२ जानेवारीपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. काल मंगळवारी रात्री महालक्ष्मी , महाकाली , सरस्वती व विष्णू या देवतांच्या उत्सवमूर्तींची प्रथम धार्मिक पूजा करण्यात आली . राधा गोविंद … हरी बोलो गोविंद जय , जय गोपाळ चा जयघोष करत या देवतांच्या उत्सवमूर्तींच्या धान्यतुलेस प्रारंभ झाला. धान्यतुलें नंतर देवतांवर सुवर्ण व रजत कमळ पुष्पांची उधळण करून देवांचा जयघोष करण्यात आला . याप्रसंगी राजस्थानमधील डीडवाना येथील झालरीया पीठाचे महंत श्री घनश्यामचार्यजी महाराज व स्वामीजी श्री भूदेवाचार्यजी महाराज, मंदिराचे प्रमुख विश्वस्त राजकुमार अगरवाल, सौ अमिता अगरवाल, विश्वस्त भरत अगरवाल, सौ तृप्ती अगरवाल, प्रसिद्ध वकील प्रताप परदेशी बांधकाम व्यावसायिक राजेश सांकला , रमेश पाटोडीया, हेमंत अर्नाळकर आदी मान्यवर उपस्थित होते .